कोरोना अपडेट

जालना:शुक्रवारी दिवसभरात 25 कोव्हीड रुग्णांवर अंत्यसंस्कार

आ. कैलास गोरंट्याल, नगरध्यक्षा सौ. गोरंट्याल व सीईओ नार्वेकरांनी दिली स्मशानभुमीला भेट

जालना (प्रतिनिधी) ः जालना नगर पालिकेच्या वतीने मंठा रोडवरील गांधीनगर परिसरात कोव्हीड रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्मशानभुमीत करोनामुळे मयत झालेल्या तब्बल 25 मृतकांवर आज शुक्रवारी दिवसभरात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकीकडे करोना बाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांना दुसरीकडे करोना बाधीत रुग्णांच्या मृत्यूचा दर दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे सर्वंत्र भितीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा सौ. संगिताताई गोरंट्याल व मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी या स्मशानभुमीला भेट देवून पाहणी केली आहे.
जालना शहर आणि जिल्ह्यात फेबुवारी महिन्याच्या सुरुवाती पासुन करोनाचा प्रादुर्भाव वाढिस लागला असून मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यात जालना शहरासह जिल्ह्यात करोनाने मोठा उद्रेक केला आहे. शहर व ग्रामीण भागात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ असल्यामुळे सरकारी व खाजगी रुग्णालयात पाय ठेवायला देखील जागा शिल्लक राहिलेली नाही. त्यातच जालना शहर व जिल्ह्यातील करोना बाधीत रुग्णांच्या मृत्यूचा दर गेल्या काही दिवसापासुन मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जालना नगर पालिकेच्या वतीने गांधीनगर मध्ये कोव्हीड रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या स्मशानभुमीत आज शुक्रवारी सकाळ पासुन रात्री 8 वाजेपर्यंत जालना नगर पालिकेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी एकुन 25 करोना बाधीत मृतकांवर अंत्यसंस्कार केले असल्याची माहिती स्वच्छता निरिक्षक अरुण वानखेडे यांनी दिली. अंत्यसंस्कार करण्यासाठी जालना पालिकेतर्फे नियुक्त करण्यात आलेल्या पथकात वानखेडे यांच्यासह श्रावन सराटे, रवि साळवे, नावेद बेग, दिपक तुपे, अनिल खंदारे, गंगाराम पवार, उत्तम भालेराव, दिपक कारके, प्रभुदास नेमाडे यांच्या समावेश असून हे सर्व कर्मचारी आपल्या जिवाची आणि कुटुंबातील सदस्यांची कोणतीही पर्वा न करता अंत्यत जोखिम पत्करुन सेवा देत असल्याबद्दल सर्वंत्र कौतुक होत आहे.

images (60)
images (60)

नागरिकांनी स्वतःची आणि कुटूंबाची काळजी घ्यावीः सौ. गोरंट्याल
जानेवारी महिन्यातपर्यंत जालना शहर आणि जिल्ह्यात आटोक्यात आलेल्या करोनाचा उद्रेक आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. करोनामुळे दररोज मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील वाढत असल्यामुळे नागरिकांनी कोव्हीड नियमांचे पालन करुन स्वतःची व कुटूंबाची काळजी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्षा सौ. संगिताताई गोरंट्याल यांनी केले आहे. जालना शहरातील करोना बाधीत रुग्णांच्या संख्येत गेल्या महिना दिड महिन्यात मोठ्या प्र्रमाणात भर पडली आहे. नागरिकांबरोबरच व्यावसायीकांनी कोव्हीड नियमांचे अपेक्षीत प्रमाणात पालन न केल्यामुळे रुग्णसंख्येत मोठी भर पडली असुन आता राज्य शासनाने लॉकडाउनचे आदेश बजावले आहे. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्याबरोबरच कोव्हीड नियमांचे देखील नागरिकांनी पालन करणे गरजेचे झाले आहे. दररोज सॅनिटायझरचा वापर करणे, मास्क लावणे, हात स्वच्छ धुने याकडे सर्वांनी जाणिवपुर्वक लक्ष देवून करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जालना नगर पालिका व जिल्हा प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा सौ. संगिताताई गोरंट्याल यांनी केले आहे

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!