सिंदखेडराजा तालुक्यातील आडगावराजा येथील व्यायाम शाळा कागदावरच.!
विकास योजनेअंतर्गत व्यायाम शाळा कागदावरच अनुदानाचा गैरवापर झाल्याचा आरोप
सिंदखेडराजा ( प्रतिनिधी ) दि ३०
सिंदखेड राजा तालुक्यातील ऐतिहासिक आडगाव राजा येथे व्यायाम शाळेच्या नावाखाली शासनाच्या १४ लाख अनुदानाचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केली असून याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वतीने सिंदखेड राजा तहसीलदार यांच्याकडे केली आहे
आडगाव राजा येथील विकास योजनेअंतर्गत व्यायाम शाळा मंजूर करण्यात आली होती त्या अद्यापही व्यायामशाळा ही कागदावरच असून सुमारे १४ लाखाचा निधी लाटण्यात आला आहे. गावात व्यायाम शाळा कुठेही बबांधण्यात आलेली नसुन संबंधिताची कायदेशीर चौकशी करून व शासनाची फसवणूक केल्य प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा व सखोल चौकशी करून तात्काळ योग्य ती कारवाई करण्यात यावी नसता मनसेच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा या मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवदादा पुरदंरे,जिल्हा उपाध्यक्ष अतिश राजे जाधव ,तालुकाध्यक्ष निलेश देवरे, तालुका अध्यक्ष महेंद्र पवार परिवहन सेना अंकुश चव्हाण मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष राधेश्याम बंगाळे पाटील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनसे अभी देशमुख तालुका उपाध्यक्ष मनसे .भागवत जाधव तालुका सचिव यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.