कोरोना अपडेट

जालना जिल्ह्यात ह्या ठिकाणी उपलब्ध असेल कोरोना लसीकरण

कोविड लसीकरणासाठी लससाठा उपलब्ध

जालना दि.5 (जालना) :- जालना जिल्ह्यात आतापर्यंत कोविड लसीकरणात पहिला डोस 1 लाख 69 हजार 600 व दुसरा डोस 32 हजार 649 एकुण लसीकरण 20 लाख 22 हजार 249 झाले आहे.

images (60)
images (60)

राज्यस्तरावरुन आज दि. 5 मे 2021 रोजी जालना जिल्ह्याकरीता 18 हजार कोविशिल्ड व 12 हजार कोव्हॅक्सीन लसीचे डोसेस प्राप्त झाले असुन सर्व ग्रामीण व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटप करण्यात आले आहेत.

उद्या दि. 6 मे 2021 करीता उपलब्ध लसीनुसार जालना जिल्ह्यात खालीलप्रमाणे कोव्हीड लसीकरण सत्रांचे नियोजन केलेले आहे. तरी अपेक्षित लाभार्थी यांनी नोंदणी करुन लाभ घ्यावा.

वयोगट 18 ते 44 करीता 1 मे 2021 पासुन पाच लसीकरण केंद्रावर उपलब्ध कोविशिल्ड लस 7 हजार 500 असुन लसीकरणाचे ठिकाण पानीवेस जालना, अंबड उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय भोकरदन, ग्रामीण रुग्णालय परतुर, ग्रामीण रुग्णालय घनसावंगी हे आहेत.

वयोगट 18 ते 44 करीता 5 मे 2021 पासुन लसीकरण केंद्रावर उपलब्ध कोव्हॅक्सीन लस 12 हजार लसीकरणाचे ठिकाण जिल्हा महिला रुग्णालय जालना, ग्रामीण रुग्णालय बदनापुर, नेर, टेंभुर्णी, मंठा, जाफ्राबाद हे आहेत.

वयोगट 45 वर्षावरील करीता 5 मे 2021 पासुन लसीकरण केंद्रावर उपलब्ध कोविशिल्ड लस 18 हजार लसीकरणाचे ठिकाण 41 प्राथमिक आरोग्य केंद्र व अंतर्गत उपकेंद्र शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, रुपम हॉल शांतीनिकेतन, शंकुतलानगर, भाग्यनगर, जुना किल्ला (नुसन वसाहत साठी) हे आहेत.

लसीकरणासाठी ऑनलाईन बुकींग आवश्यक आहे परंतु दुस-या डोसला प्राधान्य देण्यात यावे.

लसीकरण केंद्रात गर्दी करु नये. सामाजिक अंतराचे पालन करावे. तरुणांनी ऑनलाईन नोंदणी करुन दिलेल्या वेळेनुसारच लसीकरण केंद्रावर जावे. 45 वर्षावरील नागरीकांच्या लसीकरणावेळी दुस-या डोसला प्राधान्य असुन नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे , मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सवडे, जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. विवेक खतगावकर व जिल्हा लसीकरणे अधिकारी डॉ. संतोष कडले यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!