“जळगाव सपकाळ येथे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सॅनिटायझरची फवारणी”
विशेष खबरदारी सामाजिक कार्यकर्ते पप्पु सपकाळ यांचा पुढाकारातुन गावात फवारणी.
जळगाव सपकाळ:— भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे अाठवड्याभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत अाहेत त्यातच संबधीत प्रशासन दखल घेत नसल्याने कोरंटाईन तसेच रुग्ण गावातच मोकाट फिरत अाहे त्यातच ग्रामस्थ सुध्दा अाजार लपवत असल्याने घरातच त्यावर उपचार करुन अापला जिव धोक्यात घालत असल्याने रुग्णांच्या संख्येत गावात वाढ होत असल्याने गाव कोरोना हाॅटस्पाॅट होण्याची भीती निर्माण झाली अाहे याकडे गावातील संबधीत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने अखेर येथील सामाजीक कार्यकर्ते पप्पु सपकाळ यांनी बुधवारी स्व:खर्चाने संपुर्ण गावात सॅनिटायझर फवारणी करुन घेतली त्यामुळे कोरोना काळात ग्रामस्थांना मोठया प्रमाणात दिलासा मिळाला अाहे.
भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ व लोकसंख्येच्या तुलनेत दाट असलेल्या जळगाव सपकाळ येथे कोरोनाबाबत विशेष खबरदारी घेण्यासाठी पप्पु सपकाळ यांनी बुधवारी सकाळपासुन गावातील मुख्य रस्त्यावर तसेच गावातील एक ते पाच वार्डात गल्ली बोळात बस्थानक परिसरात मंदीर अादी ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणुन पंप व्दारे सॅनिटायझरची फवारणी करण्यात अाली दरम्यान गावात येथे वाढत्या कोरोनाचा कसा बंदोबस्त करता येईल व त्यासाठी ग्रामस्थांनी कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत वारंवार गावात छञपती सेनेचे सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने जनजागृती केली जात अाहे सध्या शासनाकडुन कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाय योजना अंमलात अाणल्या जात अाहे यासाठी नागरिकांनी गर्दी टाळणे देखील महत्वाचे असल्याने शासनाने राज्यात जमावबंदी लागु केली अाहे माञ जळगाव सपकाळ गावात बिनधास्त रहदारी करताना ग्रामस्थ दिसत असल्याने त्यातच कोरोना झाल्यावर सुध्दा घरातच निवारण करत असल्याने यांची ग्रामपंचायत तसेच अारोग्य विभागाला माहिती मिळत नसल्याने गावात रुग्ण वाढत असल्याचे चिञ पहायला मिळत अाहेत त्यातच अारोग्य विभागाने घरोघरी जाऊन अॅटीजण टेस्ट करावी जेणे करुन कोरोना रुग्ण कळतील व संपर्कात अालेल्याना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल त्यामुळे कोरोना रुग्णात घट होईल अशी मागणी नागरीक करीत अाहे.याच अनुषंगाने येथील सामाजीक कार्यकर्ते पप्पु सपकाळ यांनी अाज गावात सॅनिटायझर फवारणी करुन खबरदारी घेण्याची मागणी ग्रामस्थांना केली यावेळी गावातील गणेश सपकाळ,गोकुळ राजे,अमोल सपकाळ,अार.ए.सपकाळ,अवच्युतराव सपकाळ,संभाजी सपकाळ,शिवराज पालोदे,प्रकाश सपकाळ,नितीन सपकाळ,गणेश सपकाळ कृष्णा सपकाळ यासह ग्रामस्थ यांची उपस्थीती होती.