जालना जिल्हयातील विविध उद्योग संधी बाबत ११ मे रोजी मोफत वेबीनार
जालना दि.5 (जालना ब्युरो) :- जालना जिल्ह्यातील युवक युवतीना उद्योजकता प्रेरणा आणि मार्गदर्शन होण्यासाठी “चला उद्योजक होऊ या!” या शृंखलेअंतर्गत “जालना जिल्हयातील विविध उद्योग संधी” या विषयावर मोफत ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 11 मे 2021 मंगळवार रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम कार्यालयाच्या https://www.facebook.com/JalnaSkillDevelopment या फेसबुक पेजवरून थेट ऑनलाईन प्रक्षेपित करण्यात येणार आहे. यामध्ये चावडी प्रशिक्षण ट्रेनिंग व कन्सल्टंसी प्रा. लि. अहमदनगर यांचे व्यवस्थापकीय संचालक, अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शक अमित मखरे ह्या वेबीनारद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि थिंक शार्प फाउंडेश, पुणे यांचेसंयुक्त विद्यमाने “चला उद्योजक होऊ या!” या नाविन्यपुर्ण उद्योजकता अभियानातंर्गत प्रत्येक महिन्यात किमान एकदा, दुस-या आठवडयात साधारणपणे दुस-या मंगळवारी फेसबुक पेजवर https://www.facebook.com/JalnaSkillDevelopment यावरून विनामुल्य ऑनलाईन मार्गदर्शन वेबिनार शृंखला सुरू करण्यात आलेली आहे.
सदर कार्यक्रम या कार्यालयाचे अधिकृत फेसबूक पेज https://www.facebook.com/JalnaSkillDevelopment वर थेट लाईव्ह प्रक्षेपित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होणा-या युवक युवतीना व महिला यांना फेसबूक पेजवर कमेंट बॉक्स मध्ये आपले प्रश्न विचारता येतील. याची उत्तरे कार्यक्रमाच्या शेवटी देण्यात येतील. या मार्गदर्शनाचा लाईव्ह लाभ घेण्यासाठी स्वयंरोजगार ईच्छूक व नव-उद्योजक युवक-युवतीं यांनी कार्यालयाच्या JalnaSkillDevelopment या फेसबूक पेजला फॉलो करावे आणि लाईव्ह सहभागी व्हावे. या मध्ये काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी 02482-225504 अथवा jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा असे आवाहन श्री संपत चाटे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांनी केले आहे.