जालना जिल्हा

किसान करणी सेनेच्या वतीने भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथील घटनेसंदर्भात तहसीलदार व महावितरण कार्यालयात निवेदन

माहोरा : रामेश्वर शेळके
भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथे विजेचा शाॅक लागुन तीन सख्या भावांचा जिवनाचा अंत झाला होता या घटनेची दखल घेत किसान करणी सेनेने दखल घेत भोकरदन येथील मा. तहसीलदार सोहब व उपकार्यकारी अभियंता भोकरदन येथे निवेदन दिले आहे.निवेदनात दि.२६/११/२०२० पर्यंत संबंधित शेतकरी कुटुंबास तात्काळ ५० लाखांची मदत द्यावी असे आवाहन तहसीलदार मार्फत राज्याचे उर्जामंत्री या.नितीन राऊत व जालना जिल्ह्याचे पालकमंत्री मा. राजेश टोपे यांना केले आहे .२६ तारखेपर्यंत शासनाने मदत जाहीर केली नाही तर किसान करणी सेना आपल्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी किसान करणी सेनेचे पदाधिकांरी संबंधित कुटुंबास भेट देऊन धीर देण्याचा प्रयत्न केला यामध्ये प्रामुख्याने किसान करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष प्रेमसिंग धनावत , राज्य सचीव अरुण देशमुख, मराठवाडा अध्यक्ष भगवान बैनाडे, जिल्हा अध्यक्ष उदयसिंह चुंगडे, तालुका अध्यक्ष रमेश सोनवणे, जयसिंग चंदवाडे, वसंतराव जाधव, गणेश जाधव उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक