बदनापूर तालुका

कुसळी येथे दोन तरुणांचा विहिरीत विद्युत शॉक लागून मृत्यू…

अद्याप मृतदेहाचा शोध सुरू अग्निशमन दलाला पाचारण


बदनापूर: ता. (21) बदनापूर प्रतिनिधी :
बदनापुर तालुक्यातील कुसळी येथे ता. 21 रोजी दुपारी 02: 00 वाजता कुसळी शिवारात घडलेली घटना दोन तरुण विहिरीत विद्युत पंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरले असता अचानक विद्युत प्रवाह सुरू आल्याने दोन्ही तरुणा शॉक लागला यात प्रदीप कैलास वैद्य वय वर्ष 20, गणेश कृष्णा तायडे वय 23 या दोन्ही तरुणा मृत्यू पावले आहे.
यावर्षी पाऊस चांगला पडल्याने विहरीची पाण्याची पातळी ही वाढ झाल्याने विहिरी काठोकाठ भरले आहे.
हे असताना शेतीमध्ये पिकांना पाणी देण्यासाठी लगबग सुरू होती विद्युत पंप दुरुस्तीसाठी हे दोन्ही तरुण पाण्यात उतरल्याने असताना अचानक विद्युत्प्रवाह पाण्यात उतरल्याने दोन्ही तरुणाना शॉक लागला आणि दोन्ही तरुण पाण्याच्या तळाशी गेलेली आहे.


या घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस प्रशासन घटनास्थळी 03:00 वाजता हजर होते तर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते यावेळी अग्निशमन दल 03: 30 दरम्यान पोहोचले दुपारपासून या तरुणांचा शोध शोध घेत असताना अद्याप दोन्ही तरुणाचा शोध सायंकाळी 07: 00 वाजेपर्यंत चालू होता. या घटनेचे हळ हळ पंचक्रोशीतील तसेच तालुक्यात व्यक्त होत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक