कुंभार पिंपळगावात गुटखा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल
घनसावंगी पोलिसांनी केली कारवाई
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील किराणा दुकानातून गुटख्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि कारवाई घनसावंगी पोलीस प्रशासनाकडून दि.19 बुधवार रोजी करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्यात गुटखा बंदी असताना कुंभार पिंपळगाव येथील आनंद किराणा दुकानातून गुटख्याची सर्रास पणे विक्री होत असल्याचे घनसावंगी पोलीस ठाण्यास निदर्शनास आले.त्याअनुषंगाने दि.19 बुधवार रोजी अन्न व औषध पथकाने संबंधित किराणा दुकानाची तपासणी केली असता राजनिवास पानमसाला 38 पुढे एकुण रुपये 4,560 व एक्स.एल.जाफराणी जर्दा 38 पुढे पुढ्याची किंमत 120 रूपयेप्रमाणे रूपये 1,140 असा एकुण 5,700 रूपयांचे मुद्देमाल जप्त करून व्यापारी पांडूरंग चांडक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.संदर्भित प्रकरण अन्न व औषध प्रशासनाकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवसिंग बहूरे करीत आहे.