Breaking News
देशविदेश

जालना-त्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदतिची मनसेची मागणी

पळसखेडा पिंपळे येथील मृत्यू पावलेल्या जाधव कुटुंबाची मनसेकडून सांत्वन,जिल्ह्याआधिकरी यांना निवेदन सादर..

बदनापूर प्रतिनिधी:- किशोर सिरसाट

बदनापूर: ता.( 21) रोजी
मनसे जिल्हाध्यक्ष तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांनी तीन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेच्या पळसखेडा पिंपळे येथील जाधव कुटुंबातील तिघा भावांचा विहिरीमध्ये विद्युत शॉक लागून तिघा भावांचा मृत्यू पावलेल्या घटनेची जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत आहे त्या अनुषंगाने मनसेकडून ता. 21 रोजी 12:30 वाजता मयत कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करण्यात आले.. या दरम्यान जिल्हाधिकारी यांना मनसेकडून निवेदन सादर केले.
मयत झालेल्या जाधव कुटुंबाना 25 लाखाची आर्थिक मदत द्यावी. जेणे करून परिवार उघड्यावर पडणार नाही ही जी घटना घडली खूप दुर्दैवी व दुःखी घटना आहे त्यामुळे अशा परिवारांना शासनाने आर्थिक मदत करून परिवारांना आधार द्यावा अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन गीते यांनी निवेदनाद्वारे केली आहे तसेच जाधव कुटुंबाची सांत्वन करताना मायाचा आधार आणि धीर, हिम्मत दिली. तसेच सोमवार पर्यंत महावितरण विज बिल माफ करावे


अशी मागणी लावून धरली व जाधव परिवारा वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांना प्रशासनाने तत्काळ आर्थिक मदत देऊन सहकार्य करावे असे त्यांनी त्यावेळी मत व्यक्त केले जाधव परिवारांचे सांत्वन करताना मनसे जिल्हाध्यक्ष गजानन गीते, तालुकाध्यक्ष विष्णु शिंदे, तालुकाध्यक्ष शिवाजी पवार ,अमोल पिंपळे, महेश नागवे,भाऊसाहेब आवटे,मंगेश आहेर, संदीप गायकवाड, विजय फुलसुंदर, संतोष जाधव, विठ्ठल आवारे,ज्ञानेश्वर आवटे, गजानन फुलसौंदर, दीपक कुलकर्णी, बाळू पाचरणे, शिवा चोरमारे,किशोर लाबदे, बद्री गारखेडे आदींची उपस्थिती होती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक