देशविदेश

पाकिस्तानात नव्या ‘इंटरनेट धोरण’ अनेक मोठया कंपन्यांची नाराजी

देश विदेश

पाकिस्तान सरकारने नवीन इंटरनेट धोरण आणल्यामुळे जगभरातील सोशल मीडिया कंपन्यांकडून या नियमांवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
गूगल, फेसबुक, ट्विटर या दिग्गज कंपन्यांनी तर पाकिस्तान सोडण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
सरकारचे नवे नियम रुढीवादी इस्लामी राष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणण्यासाठी मंजूर केल्याचा आरोप होत आहे.
तसेच दिग्गज इंटरनेट आणि टॅक्नोलॉजी कंपन्यांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे.
त्यामुळे आधीच आर्थिक डबघाईत आलेल्या पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत.

नवीन नियमांमधील तरतुदी :
सरकारला चिथावणीखोर वाटणारा डिजिटल कंटेंट साईटवरुन हटवण्याचे आणि ब्लॉक करण्याचे अधिकार मिळाले आहेत. या अंतर्गत ‘पाकिस्तानच्या अखंडता आणि सुरक्षे’ला धोका तयार होईल असा कोणताही कंटेंट हटवता येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक