Breaking News
जालना जिल्हा

जालना शहर व तालुक्यात 9 दानपेट्या भेट


जालना/प्रतिनिधी
जालना शहर व तालुक्यात दिपावली-पाडव्याच्या निमित्ताने जितेंद्र मदनलाल अग्रवाल (घासलेटवाले) यांनी 9 दानपेट्या भेट देऊन बसवून घेतल्या आहेत.
शहरातील आराध्य दैवत पंचमुखी महादेव मंदीरात 2 दानपेट्या बसविण्यात आल्या. यावेळी मंदीराचे प्रताप महाराज चौधरी, दै. कृष्णनितीचे संपादक संजय भरतीया, हर्ष भरतिया यांची उपस्थिती होती.

स्वर्गीय मदनलाल दौलतराव अग्रवाल यांच्या इच्छेनुसार मिनाबाई मदनलाल अग्रवाल व जितेंद्र अग्रवाल यांनी आतापर्यंत विविध मंदीरात 35 दानपेट्या भेट देवून बसवून घेतल्या आहेत. तसेच शहरातील मुक्तेश्‍वर महादेव मंदीर, भवानीनगरातील गणपती मंदीर, शंकरनगरमधील गिरधारीश्‍वर महादेव मंदीर, शिवाजीनगरातील कृष्ण मंदीर,गणपतीगल्ली येथील महादेव मंदीर, देऊळगांवराजा (जि.बुलडाणा), दरेगांव येथील मारोती मंदीर येथे शनिमंदीरात बसविण्यात आली. यावेळी  आनंद ओम अग्रवाल, नरेंद्र खुदभैय्ये, दिनेश भगत, दुर्गेश कठोठीवाले, नवीन राठोड, बद्रीनाथ चौधरी, भरत काळे, गणेश पाखरे यांची उपस्थिती होती. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक