भोकरदन तालुका
भोकरदन येथे हिरवी मिरची ३ हजार शंभर रूपये भावाने खरेदीला सुरवात.
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन तालुक्यात या वर्षी मिरची लागवड मोठ्या प्रमाणात केली असुन,आता पहिला तोडा निघायला सुरवात झाली आहे,बुधवारी व्यापारी विष्णु गाढे यांनी ३ हजार शंभर रूपये मिरचीला भाव देऊन उपस्थित शेतकर्यांच्याच हस्ते मिरची खरेदीचे उद्दघाटन करण्यात आले.
या वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी मिरची लागवड केली असुन,आता मिरच्या निघण्यास सुरवात झाली आहे,आणि सुरवातीला चांगला भाव मिळत असुन,पुढेही असा भाव मिळावा अशी शेतकर्यांची अपेक्षा आहे,मागील वर्षीच्या दुलनेट या वर्षी मोठ्या प्रमाणात मिरची लागवड झालेली आहे,व सध्यातरी या मिरचीवर कुठलाही व्हायरल नसल्याने या वर्षी चांगले उत्पन्न निघेल अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे.