शेतीविषयक

कोरोना च्या पार्श्वभूमीवर बंद झालेले कापूस हमिभाव केंद्र चालु करण्याची शेतकऱ्यांची मागणी

कोरोना च्या पार्श्वभूमीवर बंद झालेले कापूस हमिभाव केंद्र चालु करण्याची शेतकऱ्यांची मागणी :

जालना न्यूज:घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समितीत सीसीआयाकडून कापुस खरेदी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या दृष्टीकोणातुन सुरक्षीततेची खबरदारी घेत.
मागील महिनाभरापासुन बंद आहे. त्यामुळे शेतक-यांची हेळसांड होत आहे.
घनसावंगी तालुक्यात सर्वाधिक पेरा कापसांचा होतो. दरवर्षी जवळपास काही लाख क्विंटल
कापसाचे उत्पादन तालुक्यात होते. त्यातच काही शेतकऱ्यांचा कापूस अद्याप घरातच असल्याने कापसाचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात लागली आहे.
कापुस हंगाम संपत आला तरीही येथील कृषी
उत्पन्न बाजार समितीत फेडरेशनचे कापुस खरेदी केंद्र सध्या बंद आहे तसेच खुल्या बाजारात देखील कापुस विक्री बंद असल्याने शेतकऱ्यांचा वर्षभरातील मेहनतीने पिकवलेला मालाच नुकसान होण्याचे चिन्ह दिसत आहेत.

सीसीआयच्या कापुस खरेदी केंद्र चालु केल्यास कापूस उत्पादकांना चांगला भाव मिळु शकतो. हे केंद्र सुरु झाल्यास शेतकरी कापुस विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समीतीत आणतील यामुळे शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.
तसेच कुंभार पिंपळगावसह परिसरातील ग्रामीण भागात जवळपास लाखो क्विंटन कापूस घरातच असल्याने शासकीय हमिभाव केंद्र चालु करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी परिसरातील दिनकर रामकीसन कोकणे,अशोक तौर,
ओमप्रकाश रामकीसन कोकाटे,अशोक नानाभाऊ बळे,
कैलास नागनाथ घुमरे,अरूण वसंत कोकणे,ऊमेश हरीभाऊ कोकाटे,राजे आबा तौर,विजयकुमार तौर,एकनाथ तौर,कैलास तौर,नंदु मस्के,शेखर साबळे,सचिन तौर,रंगनाथ भारती यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक