राजकारण

कोरोना विषाणूमुळे सुरक्षितेसाठी दक्षता : धार्मिक कार्यक्रमांना पहिल्यांदाच ब्रेक

शेकडो वर्षांच्या परंपरा खंडित !

कोरोना विषाणूमुळे सुरक्षितेसाठी दक्षता : धार्मिक कार्यक्रमांना पहिल्यांदाच ब्रेक

कुंभार पिंपळगाव :

कुंभार पिंपळगाव परिसरातील विविध ठिकाणी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना ब्रेक लागला असून अनेक शतकांची परंपरा पहिल्यांदाच खंडित झाली आहे.

कुंभार पिंपळगाव येथील अनेक वर्षांची परंपरा असलेल्या पाहुना मारुती मंदिरात दरवर्षी हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात चैत्र पौर्णिमेला साजरा होतो यावेळी यात्रेचे आयोजन होत असते यासाठी परिसरातील भक्त समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतो यावेळी भागवत कथा व इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात मात्र सध्याची कोरणा विषाणूची पार्श्वभूमीवर शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाल्याचे दिसून येत आहे त्यातच देवी दहेगाव येथील रेणुका देवीची यात्रा चैत्र पौर्णिमेला भरली जाते यावेळी मंदिर समिती व गावकऱ्यांच्या वतीने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद करण्यात आले असून यात्रा देखील रद्द केल्याचे ग्रामस्थांच्यावतीने कळविण्यात आले तसेच परिसरात पिंपरखेड हे येथे दरवर्षी जवळपास दोन शतकांपासून चालत आलेली परंपरा म्हणून नाट्यमहोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हा नाट्यमहोत्सव नामांकित असलेल्या महारुद्र प्रासादिक नाट्य मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी हनुमान जयंती पासून पाच दिवस घेतला जातो यावर्षी कोणाच्या विषाणू त्या पार्श्वभूमीवर शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत नाट्यमहोत्सव पुढे ढकलण्यात आल्याचे नाट्य महोत्सव समितीच्या वतीने सांगण्यात आले.

चौकट
समर्थ रामदास व राममंदिर शेकडो वर्षात पहिल्यांदा बंद.
घनसावंगी तालुक्यातील श्री क्षेत्र जांबसमर्थ येथील समर्थ रामदास व मर्यादा पुरूषोत्तम प्रभु श्रीराम यांचे भव्य असे मंदिर आहे जे शेकडो वर्षापासून आत्तापर्यंत कुठल्याही परिस्थितीत बंद राहिले नाही मात्र परदेशातुन आलेल्या या महामारीच्या रोगामुळे लॉकडाउन नंतर समर्थ रामदास व श्रीराम मंदिर गेल्या २० दिवसांपासुन बंद असुन प्रभु श्रीराम यांच्या जन्मदिवशी देखील मंदिर बंदच ठेवण्यात आले आहे.
तसेच दोन्हीही मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आलेले असून पुजारी यांच्या खेरीज कोणीही मंदिरात प्रवेश करत नाही.मंदिरात दर्शनासाठी,अभिषेक,अन्नदान या निमित्ताने होनारी भाविकांची गर्दी होऊ नये जेणेकरून यामुळेच शासनाच्या आदेशाचे उल्लंघन देखील नाही यामुळे मंदिर प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असून शेकडो वर्षात हि वेळ कधीच न आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक