Breaking News
देशविदेश

पारध पोलिसांवर हल्ला करणाऱ्या चाळीस जनावर गुन्हे दाखल

पारध पोलिसांवर हल्ला करणाऱ्या चाळीस जनावर गुन्हे दाखल

भोकरदन न्युज – तालुक्यातील पारध पोलीस ठाण्याचे स. पो. नि. शंकर शिंदे आणि त्यांचे कर्मचारी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर हद्दीत अवैध गावठी दारु संदर्भात गस्त घालीत असताना एका गावठी दारू विक्री करणाऱ्यास मुद्दे मालासहित पकडले सदर व्यक्तीने ही बाब मोबाईल द्वारे गावात जळकी बाजार (ता. सिल्लोड )येथे कळवली.
दरम्यान जळकी बाजार येथून चाळीस जनांचा जमाव थेट पोलिसांवर चालून आला आणि त्यांनी पोलिसांना मारहाण केली या मारहाणीत स. पो. नि. शिंदे यांच्यासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झालेले आहेत.


स. पो. नि. शंकर शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पिंपळगाव रेणुकाई येथे संतोष साहेबराव निकाळजे (रा. देहेड )याला मोटार सायकल वर अवैध गावठी दारू वाहून नेताना पकडले त्याच्याकडे चौकशी केली असता सदर ची दारू हिसोडा आणि जळकी बाजार (ता. सिल्लोड )सिमेवर एका मक्याच्या शेतात नकीम अहमद तडवी (रा. जळकी बाजार )हा हातभट्टीची दारू विकत आहे मी त्याच्याकडूनच दारू आणल्याचे त्याने सांगितल्या वरून पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारला असता त्याठिकाणी नकीम तडवी वीस लिटर च्या दोन कॅन आणि किरकोळ नऊ लिटर अशी ऐकून 49 लिटर दारू विक्री करतांना मिळून आला त्या दारूची किंमत 9900 रु. इतकी आहे. स. पो. नि. शिंदे आणि त्यांचे सहकारी सुरेश पडोळ हे सदर मालाचा जप्ती पंचनामा करीत असतांना आरोपी नकीम तडवी याने आरडाओरड करून चाळीस लोकांचा जमाव बोलावून घेतला आणि या चाळीस जणांनी पोलिसांवर थेट हल्ला चढवत काठ्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच पोलीस मोबाईल द्वारे चित्रीकरण करत होते ते पोलिसांचे मोबाईल देखील या लोकांनी हिसकावून घेतले. आणि स. पो. नि.शिंदे यांनी ताब्यात घेतलेली गावठी दारू त्यांच्याकडून हिसकावून हे लोकं पळून गेले. म्हणून पारध पोलीस ठाण्यात नकीम तडवी,जाकीर उर्फ मंजूर नकीम तडवी, जुबेदाबी नकीम तडवी, पप्पू नकीम तडवी, जैनुद्दीन अकबर तडवी, निजाम अशरफ तडवी यांच्यासह चाळीस जनांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असून तेरा आरोपीना आम्ही ताब्यात घेतले असून इतर आरोपी लवकरच आम्ही जरबंद करू अशी माहीती शिंदे यांनी दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक