Breaking News
जालना जिल्हा

पिंपळगाव रेणुकाई येथे ग्राम पंचायत च्यावतीने केली जातेय जंतुनाशक फवारणी .


भोकरदन न्यूज:- तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरण पावडरची फवारणी करण्यात आली असून सध्या जगभरात व महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने मुत्युचे थैमान माजवले असून अनेकांचा बळी या कोरोनामुळे गेल्यमुळे स्वच्छतेच्या अनुषंगाने केंद्र सरकार व राज्यसरकार व प्रशासन जिल्हा पातळीवर संपुर्णता प्रयत्न करत असुन काळजी घेतली जात आहे. जालना जिल्ह्यात कोरोना या आजाराची लागण झाल्यास तो झपाट्याने पसरत असल्याने ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागात कोरोनाचा ऊद्रेक थांबण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून ऊपाय योजना राबवण्यात येत आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत च्या वतीने जंतुनाशक फवारणीचा शुभारंभ ग्रामपंचायतचे सरपंच यांच्या हस्ते करण्यात आला गावातील प्रत्येक प्रभागामध्ये रस्ता, गल्लीबोळामध्ये व प्राथमीक आरोग्य केंद्राच्या परिसरात सुद्दा ग्रामपंचायत च्या वतीने पंप चालक विक्रम जाधव.ग्रा.पं कर्मचारी रघुनाथ परणकर व संजय मोरे या कर्मचार्यानी फवारणी केली. सध्या लाॕकडाऊन जमावबंदी आदेश लागु असून नागरीकांनी स्वतः चे रक्षण स्वतःच करावे कामाशिवाय घराबाहेर पडु नये अशा सुचना ही ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ध्वनीपेक्षकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे .बाहेर गावाहुन आलेल्या नागरीकांनी ग्रामपंचायतला माहीती देऊन सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही ग्राम पंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक