Breaking News
देशविदेश

जलदगती गोलंदाजामध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजाचे हेल्मेट फोडण्याची ताकद असायला हवी

अर्जुनने केली प्रतिस्पर्धी फलंदाजांचे हेल्मेट फोडण्याची ‘बात’

खेलजगत

कोरोना विषाणूमुळे सध्याच्या घडीला सर्वच खेळ स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. खेळाची मैदाने ओस पडली असताना खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहेत. मास्ट्रर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने सोशल मडियातील बोलंदाजीने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने जलद गोलंदाजामध्ये कोणती खास गोष्ट असावी, यावर भाष्य केले. जलदगती गोलंदाजामध्ये प्रतिस्पर्धी फलंदाजाचे हेल्मेट फोडण्याची ताकद असायला हवी, असे अर्जुन तेंडुलकरने म्हटले आहे. अर्जुन तेंडुलकरने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याने आपला आवडता अष्टपैलू खेळाडू, आवडता डावखुरा जलदगती गोलंदाज आणि आवडती महिला क्रिकेटर्सबद्दल माहिती सांगितली. बेन स्टोक्सला त्याने अष्टपैलू म्हणून पसंती दिली तर  डावखुऱ्या गोलंदाजांमध्ये मिशेल स्टार्क आणि मिशेल जॉनसन यांच्या गोलंदाजीने प्रभावित असल्याचे सांगितले. महिला क्रिकेटरमध्ये इंग्लंडची लोकप्रिय फलंदाज डेनियल वॅटला त्याने पसंती दर्शवली.अर्जुन  सध्या वडिलांचे (सचिन तेंडुकर) अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला जलदगती गोलंदाज व्हायचं होते. मात्र ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाज डिनिस लीली यांनी दिलेल्या सल्ल्यानंतर गोलंदाज होण्याचे स्वप्न बाजूला ठेवून सचिनने फलंदाजीवर लक्षकेंद्रीत केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावे अनेक विक्रमांची नोंद आहे. अर्जुनने आपल्या जलदगती गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. राष्ट्रीय संघात स्थान मिळवून एक चांगला गोलंदाज होण्याच्या दृष्टिने तो प्रयत्न करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक