राष्ट्रीय

: १५ राज्यातील २५ जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण

दिल्ली न्युज

देशात कोरोना विषाणूबाधितांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. परंतु, यातील बहुतांश प्रकरणे हे काही राज्यातीलच आहेत. देशातील अनेक भागात लॉकडाऊनचा परिणाम चांगला दिसत आहे. मागील १४ दिवसांत देशातील १५ राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या जिल्ह्यात मागील १४ दिवसांत एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. आहे. आपल्या कार्यकर्त्यांची मेहनत दिसून येत आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, गोवा, केरळ, मणिपूर, जम्मू-काश्मीर, मिझोराम, पुड्डुचेरी, पंजाब, बिहार, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड आणि तेलंगणामीधील काही जिल्ह्यात मागील १४ दिवसांत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. तर यापूर्वी याच जिल्ह्यात कोरोना विषाणूचे प्रकरणे समोर आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक