जालना जिल्हा

धान्यवाटपाबाबत तक्रार असल्यास संपर्क साधाजिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती बसेय्ये यांचे आवाहन

शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे अतिरिक्त नियतन मंजूर

जालना, दि. 13 – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत शिधापत्रीकाधारकांना धान्य वाटप करण्यात येत आहे. या धान्य वाटपाबाबत नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती रिना बसैय्ये यांनी केले आहे.
नागरिकांच्या तक्रारीसाठी शैलेश राजमाने जालना-८००७०७०२२२,डी. बी. राजपूत, बदनापूर, ९४२१९९२८३८, बी.बी.पाप्पूलवाड भोकरदन-७४१०११५२२२, श्रीमती व्ही.बी.पाप्पूलवाड जाफ्राबाद-८८०५१२८२४४, श्रीमती धनश्री भालचीम, परतूर-९१७५१००८८८,आर.आर.राखे,मंठा- ९९२१९६१२४४,एन.वाय.दांडगे,अंबड-९५५२७५६८२४ व श्री.एम.बी.उन्हाळे घनसावंगी- ७३८७३७२७६६ यांना संपर्क साधावा,
शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे अतिरिक्त नियतन
अंत्योदय अन्न योजने मध्ये लाभार्थ्यांना दरमहा प्रति कार्ड २३ किलो गहु व १२ किलो तांदुळ असे एकूण ३५ किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये २ रुपये प्रति किलोप्रमाणे गहु व ३ रुपये प्रति किलोप्रमाणे तांदुळ असा दर राहणार आहे.
प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजने मध्ये व एपीएल केशरी शेतकरी लाभार्थी योजने मध्ये दरमहा प्रति सदस्य ३ किलो गहु व २ किलो तांदुळ असे एकूण ५ किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये २ रुपये किलोप्रमाणे गहु व ३ रुपये किलो प्रमाणे तांदुळ असा दर राहणार आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल, मे व जून २०२० या प्रत्येक महिन्यासाठी प्रति सदस्य ५ किलो मोफत तांदुळ ज्या-त्या महिन्यात वाटप करण्यात येणार आहे.
उर्वरित केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना मे व जून 2020 या प्रत्येक महिन्यासाठी प्रति सदस्य ३ किलो गहु व २ किलो तांदुळ असे एकूण ५ किलो धान्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये गहु ८ रुपये प्रति किलो प्रमाणे व तांदुळ १२ रुपये प्रति किलो प्रमाणे वाटप करण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस धारकांना माहे एप्रिल, मे व जून २०२० दरमहा १ सिलेंडर याप्रमाणे एकूण ३ सिलेंडर मोफत मिळणार आहेत. गॅस सिलेंडरची किंमत ज्या-त्या गॅस धारकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ती रक्कम खात्यातून काढून गॅस कंपनीला द्यायची आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक