देश परदेश

देशभरात अजून १९ दिवस लॉकडाउन, मोदींनी केलं शिक्कामोर्तब

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासियांना साधला संवाद

देशभरात अजून १९ दिवस लॉकडाउन, मोदींनी केलं शिक्कामोर्तब

करोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय

न्यूज जालना ऑनलाइन | April 14, 2020 11:10 am

करोनाचा फैलाव वाढत असल्याने लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “करोनाचा फैलाव अद्यापही रोखण्यात यश आलेलं नाही. त्यासंबधी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली. लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. अनेक राज्यांनी आधीच हा निर्णय घेतला आहे. सर्व सूचना लक्षात घेता लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेत आहोत,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे.

“करोनापासून होणारं नुकसान खूपच कमी ठेवण्यात भारताला यश मिळालं आहे. शिस्तबद्ध रितीनं भारतीयांनी कर्तव्याचं पालन केलं आहे. अनेकांना खूप त्रास भोगावा लागला. एखाद्या सैनिकाप्रमाणे प्रत्येकजण कर्तव्य निभावत आहे. बाबासाहेब आंबेडकरांना हीच आदरांजली की प्रत्येकजण आपलं कर्तव्य पार पाडत आहे. या काळात देशाच्या वेगवेगळ्या भागात विविध उत्सव होतात. अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनच्या काळात नववर्षाचं स्वागत देशभऱात झालं, परंतु लोकांनी नियमांचं संयमानं पालन केलं. घरात राहून उत्सव लोकांनी साजरे केले ही गोष्ट प्रेरणादायी प्रशंसापूर्ण आहे,” असं यावेळी नरेंद्र मोदींनी सांगितलं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक