Breaking News
कोरोना पॉझिटिव्ह बातमी

२४ तासात आढळले १२१ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

९२ रुग्ण एकट्या मुंबईत आढळले

मुंबई :-

राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा कहर राज्यात वाढत आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाची लागण झालेले १२१ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता २ हजार ४५५ वर पोहोचला आहे. चिंताजनक बाब म्हणजे आज आढळलेल्या कोरोनाच्या १२१ नव्या रुग्णांपैकी ९२ रुग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत.तर दुसरीकडे भारताच्या इतर राज्यात सुद्धा करोना व्हायरसचा फैलाव वाढत असून करोनाबाधितांची संख्या 10 हजाराच्या पुढे गेली आहे. तसंच मृतांची संख्या ३६० वर पोहोचली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या १० हजार ६२० इतकी झाली आहे. गेल्या २४ तासात १ हजार २११ कोरोनाचे नवे रुग्ण देशात आढळले असून ३१ जणांचा कोरोनानाने बळी घेतला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक