मराठवाडा

पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी पिंपळगावातुन 44100 रुपयाची मदत

२१ हजार रुपयांचा धनादेश केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे सुपूर्द

रेणुकाई पिंपळगाव न्यूज

कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. अशा काळात हातावर पोट असणाऱ्या गरिबांना मात्र उपाशी राहावे लागत आहे. सरकारतर्फे शक्य तेवढी मदत करण्यात येत असून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह सर्व खासदारांचा पगार देखील सरकारने ३० टक्के कमी केला आहे. अशा संकटसमयी सरकार सोबतच अनेक ठिकाणी मदतीसाठी खाजगी संस्था आणि अनेक लोक समोर येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीनी देखील कोरोना साथीच्या निर्मुलनासाठी मदतीचे आवाहन केले आहे, त्या आवाहनाला देखील सर्व स्तरांमधून शक्य त्या पद्धतीने मदत देण्यात येत आहे. या पार्श्वभूमिवर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे ‘पंतप्रधान मदत निधी’मध्ये पिंपळगाव रेणुकाई येथील भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र
देशमुख यांच्याकडून २१ हजार रुपयांचा धनादेश केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यांच्याशिवाय मंगेश पेट्रोलियमचे मालक भगवान बोडखे यांच्याकडून ११ हजार रुपयायाचा.संत तुकाराम फाउंडेशनचे अध्यक्ष सतीश नरवाडे यांच्याकडून देखील अकराशे रुपयाचा धनादेश तर धाड येथील मातोश्री ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष संदीप पंडित यांच्याकडून अकरा हजार रुपयाचा असे एकूण 44100 रुपये. धनादेशाच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे पिंपळगाव रेणुकाई येथे ‘पंतप्रधान मदत निधीसाठी सुपुर्द करण्यात आले. याप्रसंगी शेलुद येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली. पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ आर एम रावुत. समाधान देशमुख.पंडीत नरवाडे. शिवनारायण आहेर. सलीम पठाण. हरिभाऊ आहेर.गणेश सपकाळ. व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक