Breaking News
मराठवाडा

अरे आता तरी शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीजपुरवठा द्या-शेतकऱ्यांची एकमुखी मागणी

शेतकऱ्यांची आर्तहाक- फेसबुकवर व्हिडीओ

ऊर्जामंत्री यांनी लक्ष देण्याची गरज

लॉकडाऊन च्या वेळेत तरी शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीज पुरवठा द्या.

जालना न्यूज-
लोकडाऊनमुळे संपूर्ण देशातील कारखाने, सर्व उधोग बंद आहे असे असतानाही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी देण्यात येणारी वीज पुरवठा वर भारनियमन का केले जाते हा प्रश्न शेतकरी बांधवातुन विचारला जात आहेलोकडाऊन मुळे विजेवरील भार कमी झाल्याचे ऊर्जामंत्री यांनी सांगितले मग जगाचा पोसीदा असलेला बळीराजा मात्र अडचणीत असताना शासनकडून शेतकऱ्यांचा विचार का केला जात नाही शेती साठी चोवीस तास वीज उपलब्ध करून दिले तर शेतकऱ्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होईल परंतु असे न करता आठ ते सोळा तास भारनियमन चालू असल्याने मात्र वीज पुरवठा उपलब्ध असून ही दिला जात नाही यामुळे शेतकऱ्यावर एकप्रकारे अन्याय्य होत असल्याचे म्हणणे आहे अशी मागणी
दिनकर रामकीसन कोकणे (तंटा मु.अ.),ओमप्रकाश रामकीसन कोकाटे,अशोक नानाभाऊ बळे,कैलास नागनाथ घुमरे,अरूण वसंत कोकणे,ऊमेश हरीभाऊ कोकाटे यांनी केली आहे

सिंगल फेज वीजपुरवठा भारनियमन च्या वेळेत बदल करण्याची मागणी
कुंभार पिंपळगाव-कोरोना आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असुन,मात्र येथील महावितरण कडून दररोज सकाळी वारंवार भारनियमन केला जातो. भारनियमन,व वीजपुरवठा खंडित करू नये,तसेच २४ तास वीज पुरवठा उपलब्ध करण्यात यावे असे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी निर्देश दिलेले असून, परंतु कुंभार पिंपळगाव येथील महावितरण कडून दररोज सकाळी ५:३५ ते८:३५ या कालावधीत भारनियमन केला जातो.या भारनियमामुळे खुप लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेक लोक हे मच्छरांमुळे आजारी पडत आहे.भारनियमनच्या वेळेत बदल करण्याची मागणी जालिंदर पवार,सर्जेराव पवार, हरिभाऊ पवार, सुरेश राठोड, रवि राठोड,गोरख पवार,गजानन राठोड,कुलदीप पवार,धोंडीराम पवार,मच्छिंद्र पवार,संपत राठोड यांनी केली आहे

विरेगव्हाण तांडा येथील ग्रामस्थांनी केली आहे.


व्हिडीओ व्हायरल ,शेतकऱ्यांची मागणी-याबाबत सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ भेडाळा येथील शेतकरी शिवाजी सुरासे यांनी फेसबुक अकाउंट वरून व्हायरल केला आहे यात त्यांनी शेतकऱ्यांना चोवीस तास वीज  पुरवठा करावा अशी मागणी केली आहे तर हा व्हिडीओ ची तालुका भरात एकच चर्चा असून याकडे साशनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक