पाऊस सुरू झाल्याने मेंढपाळ परतीच्या वाटेवर
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यात मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.त्यामुळे मेंढपाळ परतीच्या वाटेवर निघाले आहेत.वेशीच्या बाहेर माळरानारात,पडीक शेतजमिनीवर मेंढपाळाची पाले हमखास दिसतात.ऊन,वारा,पावसाचा सरी अंगावर घेत मेंढपाळ आपली जनावरे सांभाळत असतात.बिबट्यासारख्या अन्य प्राण्यांपासून रक्षण करत व्यवसायाला भरभराटीला आणतात.मान्सूनचा पाऊस सुरू झाल्याने मेंढपाळ परतीच्या मार्गाने जाताना पाहावयास मिळत आहे.
दिपावलीनंतर चाऱ्याचा शोधात मेंढपाळ घाटात, माळरानावर, जातात.सलग आठ महिने जनावरांना खाद्य उपलब्ध होईल,या आशेवर ते रानोमाळ व गावोगावी भटकंती करत असतात.एका कळपात जास्तीत जास्त 60 ते 100 मेंढ्या सांभाळल्या जातात.पती मेंढपाळ असते तर पत्नी दररोज वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करतात.त्यासाठी घोडा हे साधन वापरले जाते.या घोड्यावर मुक्कामासाठी तंबू,कोंबड्यांसाठी डारले,संसारपयोगी साहित्य वाहतूक केली जातात.जवळपास आठ महिने भटकंती व्यवसाय करताना दिसतात.सध्या पावसाने हजेरी लावण्याने मेंढपाळ परतीच्या मार्गाने जाताना दिसू लागले आहे.