जालना जिल्हा

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त परतुरात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त आकात यांच्या हस्ते धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
परतूर न्यूज :-

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील आष्टी येथील २०० गरजू कुटुंबांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिलभैया आकात यांच्या हस्ते मंगळवारी धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.दरम्यान,याच दिवशी वाहेगाव सोपारा येथेही धान्य व वस्तूंचे वाटप करण्यात आले.यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य असे सामाजिक अंतर ठेऊन नियमाचे पालन करण्यात आले.यावेळी आकात यांच्या हस्ते २०० गरजूना चार किलो गहू,चार किलो तांदूळ व एक किलो तूरडाळ ईतर वाटप करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच भागवत कडपे,भगवानराव थोरात, सत्तार मास्टर, बाबासाहेब बागल, म्रूत्यूजय कल्याणकर ग्रामपंचायत सदस्य ईतरांची उपस्थिती होती.
वाहेगाव सोपारा गावातील गरजूना देखील याच दिवशी कपिल आकात यांच्या हस्ते पाच किलो गहू, पाच किलो तांदूळ व खाद्यतेलाचा पुडा आदी सामग्रीचे वाटप करण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला सरपंच ओंकार काटे, अशोक काटे,तंटामुक्ती अध्यक्ष सुनील काटे ईतरांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक