Breaking News
जालना जिल्हा

कोरोनामुळे मेंढपाळ संकटात-चारा छावणीची मागणी

बदनापूर  न्यूज
कोरोना महासंकटात मेंढपाळांना चारापाणी छावणी आदी मदत मिळवी.कोरोना संकटामुळे देशात राज्यात जिल्हे तालुके खेडेगाव जाण्या-येण्यास बंदीअसल्यामुळे असंख्य मेंढपाळ या महासंकटात सापडले आहे उन्हाळ्याचे चार महिने शेकडो कोसोन-कोस दूर भटकंती करून चारा पाणी शोधून आपल्या कुटुंबाचे व कुटुंबातल्या सदस्य प्रमाणे जित्राबांचे जीवन चालवणारा मेंढपाळ सर्वदुर बंद असल्यामुळे दोरीवरची कसरत करीत आहे खाण्यापिण्याचे वांदे तर झालेच परंतु जित्राबांना चारापाणी मिळत नसल्याने जगणे अवघड झाले आहे सरकार मेंढपाळांना नेहमीच दुर्लक्षित करत आले परंतु या माहासंकटात आम्हाला चारापाणी,अनुदान,छावणी अदी देण्यात यावे ज्यामुळे आमच्या कुटुंबासह जित्राब जगतील हात जोडून कळकळीची विनंती आहे साहेब आमच्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करावी ही नम्र विनंती.निवेदनावर गणेश कोल्हे,जना सोरमारे.कृष्णा खरात प्रभाकर जोशी बाबासाहेब बनसोडे.बालाजी कानुले.संभाजी चांगुलपाये अदीच्या स्वाक्षरी आहे.

गणेश कोल्हे- कोरोना संकटांत ठाकरे सरकार उपाययोजना राबवण्यात उदासीन दिसत आहे मेंढपाळांना दुर्लक्षित करून चालणार नाही लवकरच मेंढरासाठी चाराछावणी व मेढपाळला 2000 हजार रूपये महीनासह10लक्ष मालकाचा विमा देण्यात यावा व प्रति मेंढी पन्नास रुपये अनुदान देण्यात यावे हि मेढपाळाच्या वतीने मागणी आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक