परतूर तालुका

तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा आगळा वेगळा उपक्रम

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त गरजू विद्यार्थ्यांला घेतले शैक्षणिक कामासाठी दत्तक


परतूर न्यूज :-
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तक्षशिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने एका गरीब व होतकरू विद्यार्थ्याला वर्षभरासाठी शैक्षणिक दृष्टया संस्थेने दत्तक घेऊन समाजाच्या बांधीलकीची जाणीव ठेउन व सामाजिक पुढाकार म्हणून वडिलांचा सहारा नसलेल्या गरीब व होतकरू विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणासाठी मदत म्हणून पुढिल वर्षभरासाठी संस्थेने दत्तक घेतले व शैक्षणिक साहित्य त्याला देण्यात आले व काही साहित्य शाळा चालू झाल्यावर देणार आहेत संस्थेच्या वतीने दर वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठया उत्सवात साजरी केली जाते व शाळेत विद्यार्थीना गित गायन स्पर्धा व बाबासाहेबांच्या जीवनावर भाषणाचा स्पर्धा घेतली जाते आणि सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप केले जाते आणि बक्षीस वितरण केले जाते.मात्र या वर्षी कोरोना वायरस पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असलेमुळे शाळेमध्ये भिम जयंती उत्सव व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम रद्द कराव लागला .त्याऐवजी एका गरिब विद्यार्थी ची वर्षभरासाठी शैक्षणिक जबाबदारी घेण्यात आली. असा वेगळा उपक्रम संस्थेतर्फे घेऊन समाजापुढे प्रेरणा दायक आदर्श संस्थेच्या वतीने निर्माण करण्यात आला .
अशी जयंती तर सर्वांनी केली तर बाबासाहेबाना हिच खरी मानवंदना ठरेल. असे संस्थेचे अध्यक्ष कैलास भदर्गे यांनी म्हटले त्यावेळी सरपंच सोनाजी गाडेकर, दिपक सवणे ,पांडुरंग काटकर, शेख इनुस, नारायण सवणे, अशोक लिंगायत, सुरेश काटकर ,आदींची उपस्थिती होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक