Breaking News
जालना जिल्हा

बँके समोर पैसे काढण्यासाठी शेतक-यांच्या रांगा

बँके समोर पैसे काढण्यासाठी शेतक-यांच्या रांगा
रांगेत उभ्या शेतक-यांना पाणी पाजण्यासाठी शकिल शेख सरसावला

रामनगर न्यूज
जालना तालुक्यातील रामनगर येथील बँकात सध्या शेतकरी व जनधन खात्यात पाचशे रुपये काढण्यासाठी महीलांची गर्दी वाढतच चाललीय. कोरोना सोबत चाललेल्या युध्दात समस्त विश्व झुंजत आहेच परंतु शेतीची मशागत व नांगरणीचे काम डोक्यावर आलेली असतांना जवळ पैसे नसल्याने बँके समोर उन्हा तान्हात उभे राहुण पैसे काढण्यासाठी धरपड चालली आहे.शेतात नांगरणी करुण रान तळु द्यावे लागते. यासाठी ट्रक्टर बोलवावे लागते व त्यासाठी पैशांची गरज पडते म्हणुन उव्हातान्हात उभे राहुण पैसे काढीत आहेत शेतकरी. पोलीसांची यात दमछाक होत आहे. सोसीयल डिस्टंसीगचे पालन व्हावे यासाठी पोलीसांना शेतक-यांच्या संरक्षणासाठी स्वत: उन्हात उभे राहुण सोसीयल डिस्टंस मेंटेन करावा लागत आहे. रामनगर येथे युनियन बँक, मध्यवर्ती बँक, ग्रामीण बँक, प्रियदर्शनी बँक,बुलढाणा बँक व बँकींग ग्राहक सेवा केंद्र आहेत सर्वांसमोर रांगा लागल्या आहेत. सर्व बँकासमोर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. उन्हात रांगेत उभे राहीलेल्यांना पाणी पाजण्याचे काम इंडीयन हॉटेलचे चालक शकिल शेख यांनी हाती घेतले आहे. प्रियदर्शनी बँकेसमोर असणा-यांना हा पाणी पुरवित आहे. सामाजीक बांधीलकीचे उदाहरण समोर ठेवित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक