Breaking News
तंत्रज्ञानमराठवाडाराष्ट्रीयशेतीविषयक

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी साधला जालन्यातील शेतकऱ्यांशी व्हिडिओ संवाद

शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे साधला संवाद

 देळेगव्हाण येथील गटशेती प्रणेते डॉ भगवान कापसे यांची माहिती

जाफराबाद न्यूज-

केंद्रीय कृषिमंत्री श्री तोमर यांनी ९ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्यातील फळबाग तज्ञ  व शेतकरी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संपर्क साधला. या व्हिडीओ कॉन्फरन्स मध्ये चंद्रकांत दादा पाटील,विनय सहस्त्रबुद्धे, डॉ अनिल बॉंडे, प्रसिध्द गटशेती प्रणेते  डॉ भगवान कापसे ,पाशा पटेल ,सोपान कांचन आदी शेती तज्ञ लोकांनी यात सहभाग घेतला होता. या चर्चेत द्राक्ष, आंबा, मोसंबी,संत्रा, चिकू, केळी इत्यादी फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांना कोरोना बाबतीत आलेल्या अडचणी, याची सविस्तर माहिती केंद्रीय कृषिमंत्री यांना देण्यात आली.

      या व्हिडीओ कॉन्फरन्स चर्चेत चंद्रकांत दादा पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री श्री तोमर यांना विनंती केली की,ज्याप्रमाणे राज्य सरकार तूर ,गहू, व इतर खरेदी करते, त्याचप्रमाणे फळांची सुद्धा खरेदी सरकारने करावी ,जेणेकरून शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळेल. असे पाशा पटेल यांनी विनंती केली. यावर केंद्रीय कृषिमंत्री यांनी सांगितले की लगेच  राज्य सरकारने ही खरेदी करावी यांच्यात जे नुकसान होईल त्यातील ५० टक्के नुकसान हे केंद्र सरकार अशी ग्वाही दिली.

         बंद पडलेले फळप्रक्रिया उद्योग सुरू करून ,तसेच मोसंबी यामध्ये सि जीवनसत्त्व असल्याने याने मनुष्यातील प्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे मोसंबी सरकारने खरेदी करून कोरोना साठी काम करणाऱ्या लोकांसाठी पूरवाव्यात अशी मागणी गटशेती प्रणेते डॉ भगवान कापसे  यांनी केली यात केंद्रीय कृषिमंत्री  यांच्याकडे केली.यावेळी कृषिमंत्री यांनी सकारात्मकता दर्शविली.

     केंद्र सरकारने शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम वितरित केली आहे. तसेच फळांच्या प्रक्रिया निर्यातीसाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे पाऊले उचलली आहेत असे त्यांनी जालना न्यूज बोलतांना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक