परतूर तालुकाशेतीविषयक

कोरोनामुळे उस्मानपूरच्या शेतकऱ्यांनी उपटली ”फुलांची बाग’

परतूर न्यूज

दुष्काळाने संकटात असलेला परतूर तालुक्यातील शेतकरी आता कोरोनाच्या या संकटामुळे पुरता उध्वस्त होत असताना पाहायला मिळत आहे .
लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे परतूर तालुक्यातील उस्मानपूर या गावचे दत्ता तुकाराम राऊत या शेतकऱ्याने आपल्या शेतातील एक एकरची गुलाब,झेंडू दीड एकर फुलांची बाग उपटून टाकली आहे.

दीड ते दोन लाख रुपये खर्च करून राऊत यांनी आपल्या दीड एकर शेतात झेंडूची बाग लावली होती.तर एक एकर क्षेत्रात गुलाबाची बाग लावली होती सध्या या गुलाब व झेंडूला फुले आली आहेत. दोन ते तीन दिवसांत ही फुले तोडून बाजारात विकली नाहीत तर ती खराब होणार होती. मात्र, बाजार पेठच उपलब्ध नसल्याने त्यांनी आपली जवळपास एक हेक्टरची बाग उपटून टाकली आहे. या बागेतून त्यांना तीन ते चार लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते.

तेल गेले तूप गेले.

लग्नसराई मध्ये या वर्षी फुलांची मागणी पाहता फुले शेतात लावली होती मात्र कोरोना या विषाणूजन्य व्हायरसमुळे मेहनत घेऊन पिकविलेला फुलांचा बाग नष्ट करावा लागला यामुळे लावले खर्चही निघाला नाही म्हणून तेल गेले तूपही गेले.अशी वेळ माझ्यावर आली असल्याची प्रतिक्रिया शेतकरी यांनी दिली पुढे त्यांनी सांगितले की शासनाने मदत करावी अशी मागणी शेतकरी श्री राऊत यांनी केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक