देशविदेश

लाँन्ड्री व्यवसाय करणाऱ्याना मदतिची संतोष शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

घनसावंगी न्यूज- सद्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस मुळे अनेकांची जीवे धोक्यात आहे त्यातच कोरोना पासून बचाव होवा या हेतूने देश लोकडाऊन करून कलम 144 लागू करण्यात आले आहे यामुळे अनेक छोट्या मोठ्या यवसाय करून आपली उपजीविका भागविराची सद्या चांगलीच धांदल उडाली आहे याच पार्श्वभूमीवर न्यू डेबुजी फोर्स चे जिल्हाध्यक्ष व संत गाडगे बाबा प्रतिष्ठाण चे अध्यक्ष संतोष विलासराव शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांना इमेल द्वारे एक पत्र पाठवून लाँन्ड्री व्यवसाईकां व्यवसाईकांना शासन स्तरावर मदत होवी अशी मागणी केली आहे सदर पत्रात नमूद केले आहे की, आमच्या या लाँड्री व्यवसाईकांचे पोट हे रोज होणाऱ्या व्यवसायावर अवलंबून आहे.
आमचे हातावर पोट असणारा लाँन्ड्री व्यवसाय आहे,हा व्यवसाय करताना काही व्यक्तिंची दुकाने भाडेतत्त्वावर आहेत तर काही जण काही दुकानांच्या मालकाकडे रोजंदारी,शेकड्यावर नग असा व्यवसाय करीत असतात त्यामुळे आज त्यांच्या समोर दैनंदिन घरगुती खर्चाचा प्रश्न उभा राहिला आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासनाने संचारबंदी लागू केली आहे त्यामुळे घराबाहेर निघून दोन पैसे कमवन बंद झाले आहे.
यात काही व्यवसायईक व्यक्तिंना शेत जमिन अथवा इतर दुसरे व्यवसाय नाहीत त्यामुळे लाँन्ड्री व्यवसाय बंद झाल्याने समाज बांधव हा उघड्यावर आला आहे हे शासनाच्या निदर्शनास आणुन देण्याचा हा छोटासा प्रयत्न संतोष शिंदे यांनी केला आहे.
शासनाच्यावतीने विविध योजनांच्या माध्यमातुन सुट दिली जात आहे.
केंद्र शासनही विविध योजनाद्वारे जादाचे मानधन देण्याचा प्रयत्न करीत आहे आमच्याही समाजाचे हातावर पोट आहे.
मागिल आठवड्यापासून सर्वच्या सर्व दुकाने बंद झालेली आहेत.
त्यामुळे त्यांच्यावर दैनंदिन खर्चाची मोठी कुऱ्हाड पडली आहे.
त्यामुळे आपण शासन दरबारी आपण स्वतःबाजु मांडावी असे समाज बांधवांना वाटत आहे.
जेणेकरुन शासनस्तरावर याबाबत तातडीने निर्णय होवुन समाजाला मदत मिळण्याचा प्रयत्न होईल.
आमच्या समाज बांधव सजग होवुन शासनदरबारी जिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्याकडे लेखी मागणी करण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र सद्या उभे ठाकलेले कोरोनाचे संकट फार महत्वाचे असल्याने समाजाने एकत्र न येता आपणाकडे हे पत्र पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. साहेब आपण आमच्या समाजाचा नक्की विचार करुन यातुन आमच्या समाज बांधवांना मदत मिळवुन द्याल अशी अपेक्षा व्यक्त करत लाँड्री व्यवसाईकांना शासन दरबारी न्याय देण्याची विनंती करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक