जालना जिल्हा

किराणा दुकानदारांकडुन ग्राहकांची लुट

किराणा दुकानदारांकडुन ग्राहकांची लुट, पारध येथील प्रकार

पारध न्यूज :-
भोकरदन तालुक्यातील पारध येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू विक्रीस शासनाने परवानगी दिली मात्र त्याचा फायदा घेत अनेक किराणा दुकानदारांनी अव्वाचा सव्वा दराने किराणा सामान विक्री सूरु केली असून पारध येथें ८५ रूपये किलो प्रमाणे मिळणारे शेगदाने आता १३० रूपये किलो , गोडतेल ९० रूपये वरून ११० रूपये झाले आहे.तर रोज वापरात येणारी साखर ही पाच रूपयाने वाढली आहे प्रत्येक वस्तूंच्या मागे पाच ते दहा रूपयांची लुट सध्या पाहवयास मिळत आहे .याविषयी ग्राहकांने दुकानदारस जाब विचारल्यास दुकानदार त्याच्याशी वाद घालतात. दुसरीकडे जा नाहीतर येऊ नका असा दम देत आहे. अधिच लाकडाऊन मुळे घरात बसून असलेल्या मोल मजूर गोरगरिबांना काम नाही त्यात रोज लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तू नाही घेतल्या तर कसे भागणार या उद्देशाने मुकाटयाने खरेदी करताना दिसत आहे.दिवसाढवळ्या अव्वाच्या सव्वा भाव वाढवून लुटणाऱ्या या दुकानदारांना कोणाचा धाक आहे किंवा नही असा प्रश्न पारध येथील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. याकडे अन्न व सुरक्षा विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक