Breaking News
जालना जिल्हा

रेणुकाई पिंपळगावात बँकेच्या खातेदाराकडून सोशल डिस्टिंग पाळण्याची गरज

पिंपळगाव रेणुकाई न्यूज:-

कोरोणा प्रतिबंधक उपाय म्हणून सोशल डिस्टिंग पाळण्याचे आव्हान बँक प्रशासनाकडून वारंवार करूनही बँकेतील खातेदाराकडून या आदेशाला हरताळ फासल्या जात आहे .सकाळी बँक उघडण्यापूर्वीच ग्राहकांच्या लांबलचक तीनशे ते चारशे फुटापर्यंत रांगा पहावयास मिळत आहे बँक व्यवस्थापक काकडून वारंवार सूचना देऊनही ग्राहक याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे आरोग्याला धोका बळवण्याची भीती आहे. रेणुकाई पिंपळगावातील महाराष्ट्र ग्रामीण बँक जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकेत ग्राहकांची सकाळपासून मोठी गर्दी दिसून येत आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स न पाळल्यास एकाद्या बाधीत रुग्णाकडुन याची संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रेणुकाई पिंपळगावात (ता भोकरदन)अशा प्रकारे सोशल डिस्टन्स पाळला जात नाही

सध्या केंद्रशासनाकडून जनधन योजनेचे महिलांच्या प्रति खात्यावर पाचशे रुपये जमा झाल्यामुळे व पंतप्रधान किसान सन्मान योजने सुद्धा 2020 चा हप्ता दोन हजार रुपये जमा झाला असून तो काढण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली असल्याचे दिसून येत आहे .परंतु शासनाने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर एक मीटर च्या आंतर ठेवुनी आपापले व्यवहार सुरळीत पार पाडावी अशी वारंवार सूचना देऊन सुद्धा आदेशाची पायमल्ली होताना दिसत आहे. परंतु गर्दी टाळणे हाच कोरोणाचा आजार टाळण्यासाठी महत्त्वाचा उपाय असून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या गर्दीतून आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दररोज बँक उघडण्यापूर्वी बँकेसमोर तीनशे ते चारशे फुटापर्यंत ग्राहक रांगा लावून उभे असल्याचे दिसून येत होते. ग्राहकांनी बँकेसमोर एकच गर्दी केली त्यामुळे सोशल डिस्टन्ससिंगचा पार फज्जा उडाला आहे. सोशल डिस्टन्स राखण्यासाठी प्रशासनाचे सर्व नियम जमाबंदी धाब्यावर बसून ग्राहक पुरुष व महिलाकडून या आदेशाची पायमल्ली होताना दिसून येत आहे. अशा गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस पाटील या बाबीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे .यासाठी ग्रामसुरक्षा दलांचे कर्मचारी या ठिकाणी नियुक्तीवर ठेवून सुद्धा ग्राहक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. अशा गंभीर परिस्थितीत शासनाचे निर्देश नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. परंतु नागरिकांच्या असहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहे. प्रशासनाने आता यापुढे सक्तीचे पाऊल उचलणे गरजेचे झाले असुन जे ग्राहक या आदेशाचे पालन करणार नाही त्यांच्या वर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक