जालना जिल्हापरतूर तालुका

ऑनलाइन अत्यावश्यक सेवेच्या पासेसला लागतोय वेळ !

आरोग्य,वैद्यकीय,व जीवनावश्यक सेवा वस्तूंच्या वाहतुकीस अडथळे !

आष्टी (प्रतिनिधी) लॉकडाऊन कार्यकाळात नागरिकांच्या आरोग्याची सेवा अन्न औषधीसह इतर अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या पोलीस पासेस मागील आठवड्या पासून चालू आहे परंतु याबाबत कुठलेही माहिती दिली जात नाही व पास स्वीकृती केल्या जात नाही यामुळे रुग्णाची बरोबरच इतर अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या व्यावसायिकांना वस्तूच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाल्याने जनसामान्यांनी सोबत अत्यावश्यक सेवा पुर्वारणाऱ्या व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसत असुन आता जावे कोणाकडे असा प्रशन सर्वांनाच पडला आहे

या विषयी अधिक माहिती आशी की, संपूर्ण संपूर्ण देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील तीन आठवड्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊन मध्ये नागरिकांच्या अत्यावश्यक बाबी लक्षात घेऊन शासनाकडून ऑनलाईन पासेस सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या  होत्या ,प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात एक अत्यावश्यक सेवा पास कक्ष स्थापन करण्यात येऊन ऑनलाईन केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून संबंधितास अत्यावश्यक पास देणे योग्य की, अयोग्य  असा शेरा ऑनलाईन पध्दतीने पाठवण्यात येत असे व योग्य शेरा असणाऱ्याना संबंधित पोलीस ठाण्यातुन अत्यावश्यक सेवा पास दिल्या जात असत यामध्ये प्रामुख्याने नागरिकांना त्याच्या आरोग्यासाठी औषधोपचार व आरोग्य सेवा घेण्यास इतरत्र जाण्याची रितसर परवानगी मिळते म्हणून संबंधित विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पुढील उपचार घेण्यासाठीचे रेफर सर्टिफिकेट घेण्यात येऊन व त्यासाठी लागणारी जी व्यवस्था असेल त्याचे कागदपत्रे व लायसन्स गाडीचे आर सी बुक व सोबत जाणाऱ्या व्यक्तीचा फोटो आदी माहिती अपलोड करून ऑनलाईन पास मागणी करण्यात येत होती परंतु मागील पाच दिवसा पासून अनेक गरजवंतांचे फॉम् सादर केले आहेत मात्र एकही ऑनलाइन पास वर कुठलाही आदेश आला नाही याने लोक हैराण झाले असल्याने लॉक डाऊन च्या काळात महत्वाच्या बाबी साठी जाण्यात एक नवीन संकट नागरिकांवर ओढवले आहे, लोकांना अन्न धान्य,किराणा,कृषी साहित्य व औषधी या सर्व गरजेच्या जीवनावश्यक गरजा ज्यात किराणा दुकानदार सध्या किराणा माल खरेदी ला जावे कसे असा प्रश्न सतावत असुन लोकांच्या जीवनावश्यक गरजा  भागविण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची इतर ठिकाणांहून ने आन करण्याची साधने अत्यावश्यक पासेस मिळत नसल्या  मुळे रखडली असल्याने नागरिकांना एका नव्या संकटाचा सामना करावा लागत असल्याचे  चित्र पहावयास मिळत आहे.नागरिकांना विविध आजारामुळे इत्रर दवाखान्यात जाणे आवश्यक असून देखील पासेस अभावी ते उपचारापासून वंचित रहात आहेत त्याच बरोबर किराणा दुकानदार औषधी विक्रेते व कृषी सेवा पुरविणारे सर्वच व्यापारी अडचणीत आल्याने याबाबतीत फार मोठी गैरसोय होत असल्याने एका नव्या समस्येला सामोरे जाण्याचे आव्हान जनतेसमोर उभे राहिले आहे.

या विषयी प्रशासनाने या बाबी कडे लक्ष देण्याची गरज आहे हे मात्र खरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक