जालना जिल्हा

जालना नगर पालिकेकडून सॅनिटाइज फवारणी


जालना ( पन्यूज) : कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत नगर पालिकेच्या वतीने शहरात नियमित सॅनिटाइजर फवारणी सुरू असून बुधवारी ( ता. १५) जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरासह जुना जालना भागात फवारणी करण्यात आली.

नगरसेवक शशिकांत घुगे, संदीप खरात, स्वच्छता निरीक्षक सॅमसन कसबे, प्रभारी स्वच्छता निरिक्षक अरूण वानखेडे, दफेदार श्रावण सराटे,अग्निशामन विभागाचे अधिक्षक विठ्ठल गोगरूड, सुभाष भालेराव,उत्तम भालेराव यांच्या सह कर्मचारी यांनी लहुजी चौक, नुतन वसाहत व जिल्हा सामान्य रूग्णालय परिसरात सॅनिटाइजर फवारणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक