Breaking News
जालना जिल्हा

रामनगर मुख्य बाजारपेठेत पोलिसांचा खडा पहारा

विनाकारण फिरणाऱ्याना मिळतोय चोप

रामनगर (जालना) न्यूज
जालना तालुक्यातील रामनगर येथील बाजारपेठ खुप मोठी आहे. परीसरातील तब्बल चाळीस गावांसाठी रामनगर बाजारपेठ जवळ पडते . शेती उपयोगी वस्तु, बियाने, खते व विक्रीसाठी रामनगरच जवळ पडते. आरोग्य विषयी सर्व सुविधा उदा. दवाखाने, हॉस्पीटल व मेडीकल सारख्या अत्यावशक सेवा सर्व प्रथम रामनगर बाजारपेठेतच मिळते व अतीदक्षतेसाठी जालना येथे जावा लागते. किराणा व जनरल वस्तपंसाठी होलसेल मार्केट रामनगर येथेच आहे. परीसरातील व रामनगर येथील किराणा दुकानदारांना खरेदीसाठी रामनगर बाजारपेठच उपयोगी पडते.फळे व भाजी पाला विक्रीसाठी शेतक-यांना रामनगर येथील बाजारपेठेतच यावे लागते. परंतु कोरोना वायरसच्या भितीने जमावबंदी व संचारबंदीचे काटेकोरपणे पालन व्हॉवे यासाठी पोलीसांना खुपच मशागत करावी लागत आहे. रस्तयावर आसेल्यांना पोलीसांनी विचारपुस केल्यास दवाखान्याची जुनी कागदपञे दाखवुन परेशान करणारे भरपुर सापडतात. मजबुरीने पोलीसांना त्यांना चोप द्यावा लागत आहे व गर्दी करू नका असे पोलीसाकडून सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक