देशविदेश

राज्यात २३२ नवीन रुग्ण आढळले, नऊ जणांचा मृत्यू; पाहा जिल्हानिहाय आकडेवारी

मुबई न्यूज– आज, १५ एप्रिल रोजी राज्यात कोरोना बाधीत २३२ नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या २९१६वर पोहोचली आहे. आज दिवसभरात ३६ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २९५ रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५२हजार नमुन्यांपैकी ४८ हजार १९८ जणांचे प्रयोग शाळा नमुने निगेटिव्ह आले आहे तर २९१६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६९ हजार ७३८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ५६१७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी मुंबईचे २, पुण्यातील ६ तर अकोला मनपा येथील १ रुग्ण आहे. त्यात ६ पुरुष तर ३ महिला आहेत. आज झालेल्या ९ मृत्यूपैकी ४ जण हे ६० वर्षांवरील आहेत ३ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या गटातील आहेत. तर दोघेजण ४० वर्षांखालील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या ९ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्चरक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्याआता १८७ झाली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे–

जिल्हा/महानगरपालिका बाधितरुग्ण मृत्यू
मुंबईमहानगरपालिका १८९६ ११४
ठाणे १२ ०
ठाणे मनपा ९७ ३
नवी मुंबई मनपा ६८ ३
कल्याण डोंबवली मनपा ५० २
उल्हासनगर मनपा १ ०
भिवंडी निजामपूर मनपा १ ०
मीरा भाईंदर मनपा ५१ २
पालघर ५ १
वसई विरार मनपा ३२ ३
रायगड ५ ०
पनवेल मनपा १० १
ठाणे मंडळ एकूण २२२८ १२९
नाशिक २ ०
नाशिक मनपा २ ०
मालेगाव मनपा ४८ २
अहमदनगर १० १
अहमदनगर मनपा १७ ०
धुळे २ १
धुळे मनपा ० ०
जळगाव १ ०
जळगाव मनपा १ १
नंदूरबार ० ०
नाशिक मंडळ एकूण ८३ ५
पुणे १० ०
पुणे मनपा ३६२ ४०
पिंपरी चिंचवड मनपा ३५ १
सोलापूर ० ०
सोलापूर मनपा २ १
सातारा ६ २
पुणे मंडळ एकूण ४१५ ४४
कोल्हापूर १ ०
कोल्हापूर मनपा ५ ०
सांगली २६ ०
सांगली मिरज कुपवाड मनपा ० ०
सिंधुदुर्ग १ ०
रत्नागिरी ६ १
कोल्हापूर मंडळ एकूण ३९ १
औरंगाबाद ० ०
औरंगाबाद मनपा २३ २
जालना १ ०
हिंगोली १ ०
परभणी ० ०
परभणी मनपा ० ०
औरंगाबाद मंडळ एकूण २५ २
लातूर ० ०
लातूर मनपा ८ ०
उस्मानाबाद ४ ०
बीड १ ०
नांदेड ० ०
नांदेड मनपा ० ०
लातूर मंडळ एकूण १३ ०
अकोला ० ०
अकोला मनपा १३ १
अमरावती ० ०
अमरावती मनपा ६ १
यवतमाळ ५ ०
बुलढाणा २१ १
वाशिम १ ०
अकोला मंडळ एकूण ४६ ३
नागपूर ५ ०
नागपूर मनपा ५० १
वर्धा ० ०
भंडारा ० ०
गोंदिया १ ०
चंद्रपूर ० ०
चंद्रपूर मनपा ० ०
गडचिरोली ० ०
नागपूर एकूण ५६ १
इतरराज्ये ११ २
एकूण २९१६ १८७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक