लाइफस्टाइल

मधूशाला लॉकडाऊन तळीराम बेचैन – परिसरातील दारू विक्री बंद

मधूशाला लॉकडाऊन तळीराम बेचैन
परिसरातील दारू विक्री बंद

बि. डी. सवडे

अकोलादेव न्यूज
”अभ तो उतनिभी मयसर नही मयखाने मै, जितनी हम छोड दिया करते थै पैमाणे मै’गझल गायक पंकज उदास यांच्या या ओळीवरून लॉकडाऊनमुळे व्यथित तळीरामांची मनोदशा कळते.
सध्या या लॉकडाऊनमुळे परिसरातील नव्हे तर जिल्ह्यातील  अधिकृत दारू विक्री बंद आहे. आपली तलप भागविण्यासाठी तळीराम 50 रुपयांची बाटली 200 रुपायाला विकत घेत आहेत. याचा तळीरामांवर चांगलाच परिणाम झाला आहे. काहींना तर व्यसनमुक्तीचा सुवर्णसंधी आल्याचे नजरेस पडत आहे.
दारू विक्री बंद असल्याने तळीरामांच्या मनाची घालमेल अतिशय वाढली असून सरकारने दारू विक्री चालू करावी यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळ्या शक्कल लढविल्या जात आहे.या दारुबंदीच्या काळात अनेक ठिकाणी बार फोडून दारू लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत.यातून एक लक्षात येते की, या लॉकडाऊन मुळे मद्यापीचा संयम सुटून अशा घटना घडत आहेत।.आता देशी विदेशी दारू बंद झाल्याने तलप भागवायची म्हणून गावरान दारूचा पर्याय म्हणून तळीराम वापर  करत आहे.

मद्य आणि मद्यापी यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा वेगळाच दृष्टीकोन असतो. तरीही सुख दुःख यातील कोणताही क्षण दारू पिऊन साजरा केला जातो.तसे दारू पिण्यासाठी वेगवेगळे कारणे शोधतात अशातून 15 टक्के लोक व्यसन करतात. उर्वरीत 85 टक्के सोशल ड्रिंकर मद्याचा आस्वाद घेतात. या तळीरामां मध्ये विशेष वर्गवारी आहे.विदेशी, देशी, गावठी, अशी या वर्गवारीतील तळीराम परस्परांना कमी लेखतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक