दिनविशेष लेखक

आजच्या ‘कोरोना लाॕकडाऊनच्या’ यशस्वीतेसाठी शिवचरित्र प्रेरणादायी….!

तूर्त सावधगिरी,संयमाने घरात राहूनच कोरोनाचा लढा द्या

लेखक -प्रा.अरूण आहेर

आपला देश आज कोरोनाच्या महासंकटाला सामोर जात आहे. या संकटातून  बाहेर पडण्यासाठी आपल्या आपल्या घरातच राहून  या शत्रूला नामोहरम करणे गरजे आहे.कारण की,शत्रू आपल्या दारावर उभा आहे त्यामुळे आपल्याला आपल्या  सरकारने  दिलेली लक्ष्मण रेखा पाळावीच लागेल. कारण की,छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ‘लॉकडाऊन’अनुभवला होता. छत्रपती शिवरायांनी जसे आपल्या कारकीर्दीमध्ये शत्रुंशी सावधगिरीने संयमाने आणि शांत डोक्याने निकराचा लढा दिला, शत्रू फक्त त्यांची बाहेर पडण्याची वाट पाहत होता. मात्र छत्रपती शिवराय योग्य वेळ आल्याशिवाय बाहेर पडले नाहीत. तसेच आज ‘कोरोनाशी’ लढा देण्यासाठी आपल्याला तूर्त सावधगिरी,संयमाने घरात राहूनच कोरोनाचा लढा यशस्वीपणे पार करून आपल्या देशासाठी घरी बसूनच खरी देशसेवा आता करायची आहे. ज्या वेळेस सिद्धी जौहरने पन्हाळगडाला वेढा दिला होता. त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी  ही तब्बल १३२ दिवस म्हणजे २ मार्च १६६० ते १२ जुलै १६६० एवढा काळ  पन्हाळगडाच्या वेढ्यात काढला. तो ही एक प्रकारे ‘लॉकडाऊन’चाच प्रकार होता.आणि त्यावेळी त्यांच्यासोबत घरातील कुटुंबातील कोणीच व्यक्ति उपस्थित नव्हते. गडावर ना टीव्ही,ना मोबाईल,ना इंटरनेट, नाही कोणी संस्था-मंडळ, किंवा नेते घरपोच अन्न पुरवत होते तरीही त्यांनी १३२ दिवस म्हणजे जवळजवळ ४ महिने त्या ‘लॉकडाऊन’चा सामना केला. आणि ११जुलै १६६० च्या रात्री रात्री बाहेर पडायचे ठरवून, मोहीम फत्ते केली . आणि आज आपल्याला आपल्याच घरी आपल्या कुटुंबासोबत, सर्व सोयी सुविधा असताना सुद्धा २१ दिवस गप्प घरी बसवत नाही. मग आपण शिवरायांच्या मातीत जन्माला येऊन उपयोग काय? राजांचा इतिहास मनापासून वाचला पाहिजे आणि त्यातून बोध घेतला पाहिजे . शिवचरित्र आपल्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर नक्कीच देते. नुसते जय शिवराय बोलून उपयोग नाही शिवराय मनात, आणि डोक्यात शिरायला हवेत. आणि शिव चरित्रानुसार कोरोना सारख्या जैविक शत्रूला नमोहरम करून देशभक्ती व देशसेवेच्या सुवर्ण संधीचं सोनं नक्कीच  केलं पाहिजे, आणि ते आपण सर्वजण मिळून करुया….

प्रा .अरुण आहेर

-प्रा.अरूण वामनराव आहेर ( लेखक तथा व्याख्याते)मो.नं.-७५०७९७८४७७ जालना महाराष्ट्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक