शेतीविषयक

उत्पादित माल व भाजीपाला ची नोंदणी करून विक्रीसाठी कृषिविभागाची मदत

बादनापूरच्या शेतकऱ्यांना दिलासा.
बदनापूर न्यूज

लॉकडाऊन मूळे फळे ,भाजीपाला, दूध ईत्यादी विक्री व वाहतूक करण्यास अडचणी येत होत्या,परिणामी सोन्यासारखा माल फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर अली असती,हा धोका ओळखून, मा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. शिंदे ,उपविभागीय कृषी अधिकारी कोकाटे यांनी वेळीच उपाय योजना करून सर्व शेतकऱ्यांचा उत्पादित माल व भाजीपाला याची क्षेत्राय कर्मचारी व आत्मा यांच्या मार्फत नोंदणी करून गटा मार्फत शहरा मध्ये विक्री करण्याची व्यवस्था केली,तशेच जे शेतकरी त्यांच्या भाजीपाला व द्राक्ष हे इतर जिल्हा / परराज्यात विक्री करतील त्याना पण परवानगी दिली आहे .अश्या बिकट परिस्थिती मध्ये यामुळे शेतकऱ्यांचे होनारे नुकसान कमी झाले,तशेच लोकांना ताजा भाजीपाला व फळे मिळू लागली, त्यामुळे शहरी भागातील लोक घराबाहेर न पडता,त्याना घरपोच सर्व जीवनावश्यक वस्तू मिळू लागल्या व शेतकऱ्यांना पण उत्पादित मालाचे पैसे मिळण्यास हातभार लागला ज्या शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या माल विक्री करायचा असेल त्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यलयात अर्ज करावा म्हणजे त्यांना लगेच परवानगी देता येईल असे आव्हान व्हि एस ठक्के तालुका कृषी अधीकारी बदनापूर यांनी केले आहे या कामी कृषी विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यानि नियोजन करून शेतकऱ्यांना मदत केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक