जालना जिल्हामंठा तालुका

मंठात गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

मातोश्री समाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थचा उपक्रम

मंठा न्यूज : मातोश्री समाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने लॉक डाऊनच्या काळात हलाखीचे जीवन जगणाऱ्या गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट देऊन दिलासा देण्याचे काम केले आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील गरजू कुटुंबांना केलेली मदत निश्चितच आधार देणारी आहे. मातोश्री समाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा सामाजिक कार्यात पुढाकार असतो असे संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार अनिल बा खंदारे यांनी सांगितले संकटाच्या काळात गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे हीच खरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली ठरेल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गरीब कुटुंबासोबत साजरी करण्याचा निर्णय श्री खंदारे यांनी घेतला. याप्रसंगी मंठा नगरपंचायत गटनेते तथा नगरसेवक बालासाहेब, बोराडे विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालयाचे संचालक नायबराव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते विजय चव्हाण, पत्रकार दिनेश जोशी, संतोष दायमा, श्रीमंत हातकडके यांची उपस्थिती होती. मातोश्री समाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मागील पाच वर्षापासून मंठा तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे दरवर्षी महापुरुषांच्या जयंती निमित्त अन्नदान पाणी वाटप आदि कामासोबतच केरळ पूरग्रस्तांना आर्थिक मदत विधवा परितक्त्या महिलांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी वहया पुस्तक स्टेशनरीचा खर्च संस्थेने केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल बा खंदारे यांनी दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक