माजी सरपंचाच्या पतिला ग्रामपंचायत शिपायाचे पद,पद रद्द करुन ग्रामसभा घेवुन गरजुला हे पद देण्याची मागणी
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन तालुक्यातील ग्रापपंचायत भायडी येथिल सरपंच व ग्रामसेवक यांनी सिपाई पदाची अधिसुचना न करता ग्रामसभा न घेता ग्रामपंचायत ( सिपाई पद ) गरजु व्यक्तिला न घेता , माजी सपरंच यांच्या पतीला नियमाबाहय नियुक्ती केले असुन हे पद त्वरित रिक्त करुन हे पद गावातील गरीब व गरजु व्यक्तीला द्यावे असे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, प्रसतुत विषयी आपणांस तक्रार अर्ज सादर करतो की , ग्रुप ग्रामपंचायत भायडी तळणी , विरेगांव ता.भोकरदन जि.जालना . अंतर्गत गेल्या दोन वर्षापासुन जगन्नाथ कळसाईद यांची शिपाई पद सेवा निवृत्ती नंतर पद रिक्त आहे . संबधित पद भरती साठी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत जाहिर प्रगटन काढुन अर्ज मागवणे बंधनकारक असतांना सुध्दा सरपंच व ग्रामसेवक यांनी सर्व नियम डावलून नियमाबाहय ठराव घेवुन चुकिच्या पद्दतीने शिपाई पद नियुक्त करून ठराव गटविकास अधिकारी साहेब यांच्याकडे सादर केला आहे . प्रस्तुत ठराव ग्रामपंचायत अधिनियमास धरून नसल्यामुळे संबंधिताची ठराव व्दारे सदर नियुक्ती रद्द करावी व सदरील पद भरण्याची प्रक्रिया गटविकास अधिकारी साहेब मार्फत व्हावी , अन्यथा गावकरी मंडळी उपोषण किंवा धरणे आंदोलन करण्यात येईल याची गांभियाने नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर महेश संजय दसपुते, शिवलाल कन्हैयालाल जोहीरे, कृष्णा बाबुराव निकाळजे , सुभान दगडु शाहा,प्रकाश साळवे,लताबाई रामचंद्र गायके,योगिता संतोष दळवी,एस.टी.पिसे अस अदिच्या साक्षर्या आहेत.
