Breaking News
जालना जिल्हाजालना तालुका

रामनगर मध्ये संचारबंदीचे उल्लंघन – हॉटेल मालकावर गुन्हा दाखल


रामनगर न्यूज –
जालना तालुक्यातील रामनगर येथे लॉकडाऊन काळात हॉटेल उगडी ठेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात एका हॉटेलच्या मालकाविरुद्ध विरुद्ध गुन्हा गुरुवारी दुपारी दाखल करण्यात आला आहे.
जालना तालुक्यातील रामनगर येथील जालना मंठा महामार्गावरील इंडीयन हॉटेल बुधवार रोजी दुपारी तिन वाजे दरम्याण उघडी ठेवून लोक जमलेल्या अवस्थेत मौजपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉंस्टेबल सागर खैरे यांनी बघीतले व तात्काळ ठाण्यात सदर घटनेची माहिती दिली. मौजपुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या आदेशान्वये सागर खैरे यांच्या फिर्यादी वरुन माननिय जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघण करुण विषाणु संसर्ग परविण्यास मदत केल्या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुण्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ चिंचपुरे करीत असल्याचे ठाणे अमलदार बाहेस यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक