जालना जिल्हापरतूर तालुका

पैसे काढण्यासाठी भर ऊन्हात महिला उभ्या.


परतूर न्यूज-
जनधन खात्यावरील पैसे काढण्यासाठी भर उन्हामध्ये सामाजिक अंतर ठेऊन महिलाच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परतूर समोर व सी एसी सी सेंटर समोर दर रोजच माहीलांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लाकडाऊन मुळे बेरोजगारीची कुऱ्हाड मध्यमवर्गीयावर कोसळली आहे .हाताला काम नाही .घरात राशन नाही .

जवळ पैसा नाही .यामुळे मजबुरीने पाचशे रुपयासाठी गोरगरीब महिलांना भर ऊन्हात सामाजिक अंतर ठेऊन रांगेत चार ते पाच तास उभे राहावे लागत आहे. या मुळे महीलांना ऊन्हाच्या झळा सोसाव्या लागत असुन आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परतूर प्रशासनाने महीलांना उभे राहण्यासाठी उन्हाचा पर्याय म्हणून तात्पुरत्या स्वरूपात सावलीचा पर्याय उभा करावा अशी महिलांकडून मागणी होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक