Breaking News
जालना जिल्हापरतूर तालुका

कोरोनामुळे टळले प्रवाश्यावरील संकट !

आष्टी बसस्थानकाच्या निवारा शेडला पडले मोठे भगदाड

आष्टी ता परतूर (न्यूज) आष्टी ता परतूर येथील बसस्थानकाला लागलेली घरघर कायम असुन मागील काही महिन्यापासून आष्टीचे बसस्थानक चांगलेच चर्चेत असुन कोरोना मुळे याची चौकशी आणि चर्चा थोडी थांबली होती खरी मात्र या बसस्थानकाची घरघर काही सुटत नसल्यचे दिसून येत आहे काल या बसस्थानकाच्या शेडची पीओपी चा मोठा भाग कोसळला सुदैवाने सध्या कोरोना मुळे लॉकडाऊन असल्याने या बसस्थानकात एकही प्रवाशी नसल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी बसस्थानकाच्या शेडचा उर्वरित पीओपी चा भाग धोकादायक बनला असुन या कडे परिवहन मंडळाने लक्ष देण्याची गरज आहे दरम्यान या बसस्थानकाच्या कामाबाबत सामाजिक कार्यकर्ते उद्धव डोळस यांनी या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार देत चौकशीची मागणी महिनाभरा पूर्वी केली होती.

त्या अनुषंगाने या बसस्थानक कामाच्या चौकशीचे आदेश विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी काढलेले आहेत मात्र सध्या कोरोना मुळे थोडे लांबणीवर पडले आहे त्यातच पुन्हा हा इमारतीच्या निवारा सेडचा बराचसा भाग कोसळून मोठमोठी भगदाडे पडली आहेत सुदैवाने लॉकडाऊन असल्याने याठिकाणी कोणीही प्रवाशी नव्हते त्यामुळे हे जिवघेणे संकट देखील टळले आहे. या विषयी अधिक माहिती आशी की, आष्टी ता.परतूर येथे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन योजनेअंतर्गत जवळपास ब्यांशी लक्ष रुपये खर्च करून जुन्या कामावर नवीन इमारत उभी करून अपहार केल्याची तक्रार विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात आली होती आणि त्या तक्रारीची दखल मा आयुक्त यांनी घेऊन संबंधित विभागाच्या मुख्य हेडचे संचालक जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा जालना यांना आदेश काढून कामाच्या चौकशी बाबत कार्यवाही करावी व अहवाल सादर करण्यात यावा असे एका पत्राद्वारे सुचविले आहे. त्याच वादग्रस्त बसस्थानकाच्या प्रवाशी निवारा सेडची पीओपी गळून पडत असून मोठमोठी भगदाडे पडली आहेत. उंचीवरून खाली कोसळल्याने बसलेल्या प्रवाशांना गंभीर दुखापत करू शकते करण्यात आलेले कामाचा दर्जा खरोखरच चांगला आहे का असा प्रश्न पडत असुन बसस्थानका सारख्या अति संवेदनशील व नेहमी वर्दळ असणाऱ्या ठिकाणी जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार असा प्रश्न ग्रामस्थांतुन उपस्थित केला जात आहे कोरोना मुळे लॉक डाऊन सुरू आहे अन्यथा आतापर्यंत अनेक जण ठिकाणी जखमी झाल्याचे दिसून आले असते तर या कामाची चौकशी देखील कोरोना मुळे रखडली असून या बोगस व जिवघेण्या इमारतीच्या गैरव्यवहार प्रकरणाचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक