घनसावंगी तालुकाशेतीविषयक

घनसावंगीचे सीसीआयची कापूस खरेदी केंद्र सुरू : व्हाट्सअप द्वारे होणार नोंदनी

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जालना नानासाहेब चव्हाण यांचे आदेश

घनसावंगी न्यूज :

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सी सी आय ची कापूस खरेदी केंद्र बंद झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरात आडकुन पडला होता यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात असताना शासनाकडे कापूस खरेदी केंद्र चालु करण्याची मागणी करण्यात आली होती.
दरम्यान शुक्रवार पासून नोंदणीला सुरुवात होत असून फोन करून शेतकऱ्यांना बोलावले जानार असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे राहुल गुजर यांनी सांगितले.
लॉकडाउन च्या काळात नियमानुसार कापूस उत्पादक शेतकरी व उद्योग यांना सूट दिलेली असल्यामुळे कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे व नियमानुसार कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश मिळाले असून कापूस खरेदी केंद्रावर सर्व सुविधा पुरवणे बाबत कृषी उत्पन्न बाजार समिती यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच शेतकऱ्यांनी रहिवासी असलेल्या तालुक्यात सदर बाजार समितीने दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे आपला सातबारा आधार कार्ड व अंदाजित कापूस वजनाची माहिती पाठवावी अशाप्रकारे नियोजन करण्यात आले असून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था च्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे राहुल गुजर यांनी जालना न्यूज शी बोलताना दिली. यासाठी खालील व्हाट्सउप वर नोंदणी करावी मो. ९०४९६०१११९ राहुल गुजर यांना करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक