Breaking News
जालना जिल्हाभोकरदन तालुका

कोसगाव आणि मोहळाई येथे स्वस्त धान्य दुकानांतून मोफत धान्य वाटपास सुरवात

भोकरदन न्यूज – तालुक्यातील कोसगाव आणि मोहळाई येथे स्वस्त धान्य दुकानांतून मोफत धान्य वाटपास सुरवात करण्यात आली आहे.
कोरोनाच्या प्रतिबंद च्या उपाययोजना साठी व संपुर्ण भारतात लॉकडाउन चालु असल्याने सर्वसामान्य व गरीब जनतेला हाताला काम नसल्याने उपासमार होऊ नये म्हणून मोहळाई येथील आत्माराम नाटूबा पालकर व कोसगाव येथील मनोहर हिवाळे व इस्माईल भिकन तडवी यांच्या राशन दुकानातून शासनाकडून नियमित येणारे धान्य व मोफत धान्य जलदगतीने येऊन त्या धान्याचे आज पासून वाटप सुरू केली आहे यावेळी पोलीस पाटील सुरेश पालकर सरपंच सांडू पालकर व सुखदेव पालकर या सह आदीची उपस्थिती होती व ग्रामसुरक्षा दलाचे संतोष काकडे व परमेश्वर पालकर तैनात होते व कोसगाव येथे राशन दुकानांवर सरपंच गजानन सुसर व शाळेचे मुख्याध्यापक भोंडे,जाधव,काटोले,पट्टे हे शिक्षक, मा.सरपंच बालाजी काथार व ग्रा.सं अवचित शिंदे उपस्थित होते.
या दुकानांवर लोकांचं गर्दी एकच होऊ नये म्हणून ग्रामसुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते या राशन दुकानात तांदुळाची मोफत वाटप होत आहे
नागरिकांच्या मागणीनुसार तांदुळासोबत तूर डाळ,हरबरा डाळ,गोड तेल व गहू आदी सामान मोफत मिळला पाहिजे अशीही ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक