Breaking News
देशविदेश

एकूण झालेल्या चाचण्यांपैकी अडीच टक्के रुग्ण पॉझॣटिव्ह- आरोग्यमंत्री

पुल टेस्टींग, रॅपीड टेस्टींगसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) मागितली परवानगी

मुंबई न्यूज – राज्यात कंटेनमेंट कृतीआराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असून कोरोना रुग्णांच्या दुप्पटीच्या दराचा वेग हा 2 दिवसांवरून 6 दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब असणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.तर राज्यात सध्या शासकीय २१ आणि खासगी १५ चाचणी प्रयोगशाळा आहेत त्यात अजून सहा प्रयोगशाळांची भर पडून ही संख्या ३६ होईल. राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर देशात जास्त आहे. त्यातील ८३ ट्कके मृत्यू हे रुग्णाला पुर्वीपासून जडलेल्या मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, मुत्रपिंडचा विकार यामुळे झाले आहेत. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या मार्फत राज्यात उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णासाठी तातडीचा वैदयकीय सल्ला दिला जाईल. त्यासाठी समितीतील तज्ञांचे संपर्क क्रमांक राज्यभरातील रुग्णालयांना कळविण्यात आले आहेत.राज्यात आतापर्यंत झालेल्या ५१ हजार चाचण्यांपैकी निम्म्या चाचण्या ह्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. एकूण झालेल्या चाचण्यांपैकी अडीच टक्के रुग्ण पॉझॣटिव्ह आढळले आहेत.

पुल टेस्टींग, रॅपीड टेस्टींगसाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे (आयसीएमआर) परवानगी मागितली आहे.राज्यात सध्या ३०० कोरोनाबाधीत बरे झले आहेत त्यांच्यातील रक्तद्राव (प्लाझ्मा) काढून कोरोना बाधीत रुग्णांना ते देऊन त्यांच्यातील अँटीबॉडीज वाढविण्याच्या नविन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबतही आयसीएमआरकडे परवानगी मागितले आहे.केंद्र शासनाकडे राज्याने ८ लाख एन-९५ मास्कची मागणी केली असू त्यापैकी १ लाख मास्क उपलब्ध झाले आहेत, सुमारे ३० हजार पीपीई कीट उपलब्ध झाले आहेत. दिल्ली येथे मरकजसाठी राज्यातील जे तबलीगी बांधव गेले होते त्यातील सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या चाचण्याही करण्यात आल्या आहेत. त्यातील ५० जण पॉझीटिव्ह आढळून आले आहेत.अत्यावश्यक सेवा, शेती याबाबत टाळेबंदीत शिथीलता आणण्याबाबत केंद्र शासनाकडून ज्या सूचना दिल्या जातील त्याचे पालन केले जाईल. २० एप्रिल नंतर परिस्थिती पाहून टाळेबंदीमध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक