भोकरदन तालुका
भोकरदन येथे गरजुंना राशन,सॅनिटायझर व मास्क वाटप
मधुकर सहाने : भोकरदन
भोकरदन शहरातील पुखराज नगर येथिल दोन विद्यार्थीनीने झोपडपट्टीत राहाणार्या गरीब व गरजावंतांना राशन किट व सॅनिटायझर ,मास्क वाटप केले.
शहरातील पुखराज नगर येथिल अश्विनी गायकवाड व शितल दिवेकर या दोन विद्यार्थीनीने भोकरदन येथिल झोपडपट्टीत राहाणार्या गरीबांना गहु,तांदुळ,गोडतेल,बाजरी पीठ,व सोबतच सॅनिटायझर व मास्क वाटप करुन मास्क आणि सॅनिटायझर वापरण्यासाठी मार्गदर्शन केले.यावेळी लीलाबाई रणदिवे, विमलबाई गायकवाड़, अश्विनी गायकवाड़, शितल दिवेकर, मयुरी दाभाडे ,कोमल दिवेकर ,तन्वी रणदिवे, यश रणदिवे ,अदिंची उपस्थिती होती.