तंत्रज्ञान

आरोग्य सेतु ॲप इंस्टाल करून माहिती देतायेत आपले सरकार केंद्र चालक


कुंभार पिंपळगाव : 
घनसावंगी तालुक्यातील ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत काम करणारे संगणक परिचालक यांनी गावातील स्मार्टफोन धारकांना आरोग्य सेतू ॲप चे इन्स्टॉलेशन करून त्या बाबत माहिती व कोरोना विषाणू बाबत बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात येत असून गावातील नागरिकांचे कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षितता म्हणून सर्वेक्षण देखील केले जात आहे.    सध्या जगभरात करोना(covid19)  या विषाणूने धुमाकूळ घातलेला आहे. त्याचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार हे युद्धपातळीवर काम करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून सर्व नागरिकांना ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे त्यांनी शासनाने दिलेल्या लिंक वर जाऊन आरोग्य app install करून त्यामध्ये सर्व माहिती  भरून लक्षणावर आधारित संसर्ग होण्याची शक्यता तपासू शकतो तसेच सुरक्षित राहण्यासाठी वेळोवेळी माहिती मिळणार आहे. जर एखादा positive रुग्ण आपल्या जवळ आला तर या app च्या माध्यमातून आपल्याला alert मिळणार आहे. कुटुंबातील व जवळच्या नातेवाईकांना सुद्धा app इन्स्टॉल करायला सांगा व कोरोनविरोधातील लढ्यात सरकारला मदत करा तसेच  घरी राहा सुरक्षित रहा     सुरक्षित अंतर पाळाअशी जनजागृती करत गावात घरोघरी जाऊन स्मार्टफोन धारकांना हे ॲप सक्रिय करून त्या बाबत माहिती देण्याचे व नागरिकांचे सर्वेक्षणचे व जनजागृतीचे काम हे संगणक परिचालक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक